Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Protest Live: जंतर-मंतरवर विद्यार्थ्याचे आंदोलन, अभिजीत दिपके कुठे आहे?

CJP Protest: गेल्या महिनाभरापासून आंदोलन शांततेत सुरू होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. मात्र आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर परिस्थिती बदलली. आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी आणि आंदोलकांना चिथावणी देण्यासाठी बाहेरून लोक पाठवले जात आहेत.गेल्या महिनाभरापासून आंदोलन शांततेत सुरू होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 23, 2026 | 03:31 PM
मोठी बातमी ! अभिजित दीपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; शिक्षिकेनेच दिली तक्रार अन् नंतर...

मोठी बातमी ! अभिजित दीपके यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; शिक्षिकेनेच दिली तक्रार अन् नंतर...

Follow Us
Follow Us:

CJP Protest Live: जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपली प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. वेदनाशामक औषधांमुळे काही दिवस आंदोलन सुरूच ठेवलं आहे, पण आता तातडीने डॉक्टरांच्या उपचारांची गरज असल्याचे अभिजीत यांनी म्हटले आहे.

दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत यासंदर्भात की, “गेल्या काही दिवसांपासून मला ताप आणि शरीरात तीव्र वेदना आहेत. त्यामुळे आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही, तर त्याबद्दल क्षमस्व. प्रकृती सुधारण्यासाठी काही तास विश्रांती घेणे आवश्यक आहे. संध्याकाळपर्यंत मी पुन्हा आंदोलनस्थळी परत येईन.”

Supreme Court Metro Station: ‘जर सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन दुपारपर्यंत उघडले नाही तर..: सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे आश्वासन

‘आंदोलनात अडचणी आणण्यासाठी बाहेरून गुंड पाठवले जातायेत- अभिजीत दिपके’

बुधवारी रात्री जंतरमंतरवर झालेल्या हिंसाचारांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी संताप व्यक्त केला. आंदोलनात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्यासाठी भाजपकडून बाहेरून गुंड पाठवले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच आंदोलनात घुसखोरी करून दगडफेक करून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप आरोप केला.

दीपके म्हणाले, “गेल्या महिनाभरापासून आंदोलन शांततेत सुरू होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडली नव्हती. मात्र आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर परिस्थिती बदलली. आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी आणि आंदोलकांना चिथावणी देण्यासाठी बाहेरून लोक पाठवले जात आहेत.”

“दगडफेक करणारे हे भाजपचे लोक, भाजपचे समर्थक आहेत. पोलिस घटनास्थळी दगडांनी भरलेले ट्रक आणतात. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते दगडफेक करून CJP कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.” असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेला लाठीमार अत्यंत क्रूर होता, असा आरोप करत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले.

CJP Protest News: जंतर-मंतरवरील राड्यानंतर दिल्लीत कडक निर्बंध; अभिजीत दिपकेंचा थेट हल्ला

मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील’

दीपके यांनी सांगितले की, “लाठीमाराबाबत मी यापूर्वीही भूमिका मांडली आहे. तो अत्यंत क्रूर होता. या कारवाईस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. आंदोलनाचा गुरुवारी 34 वा दिवस असून सोनम वांगचुक यांचे उपोषण 26 व्या दिवशीही सुरू आहे. “आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले. अभिजीत दीपके यांनी केलेल्या भाजप आणि पोलिसांवरील आरोपांबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

 

 

 

Web Title: National news delhi jantar mantar cjp protest abhijit dipke unwell fever health update x post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • Cockroach Janta Party
  • Jantar Mantar
  • Student Protest

संबंधित बातम्या

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी
1

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल
2

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
3

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा
4

Pune Tribal Students Protest : मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आंदोलनाची दाखल, फडणवीसांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.