
नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीच्या वक्तव्यामुळे देशात खळबळ; काँग्रेसकडून हकालपट्टी (Photo Credit - X)
Dr Navjot Kaur Sidhu has been suspended from the Congress party with immediate effect. pic.twitter.com/8dGjNaLn5n — ANI (@ANI) December 8, 2025
‘५०० कोटी देणाराच सीएम’
नवज्योत कौर यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्ही नेहमी पंजाब आणि पंजाबियतचीच गोष्ट करतो… पण आमच्याकडे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी ५०० कोटी रुपये नाहीत.” जेव्हा त्यांना कोणी पैसे मागितले आहेत का, असे विचारले गेले, तेव्हा त्या म्हणाल्या, “कोणी मागितले नाहीत, पण जो कोणी ५०० कोटी रुपये देतो, तो मुख्यमंत्री बनतो.”
विवाद आणि स्पष्टीकरण
या वक्तव्यानंतर मोठा राजकीय वाद निर्माण झाला. कौर यांनी नंतर आपला मुद्दा तोडमोड करून सादर करण्यात आला, असे स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, “मी फक्त एवढेच म्हटले की काँग्रेस पक्षाने आमच्याकडे कधीच काही मागितले नाही. नवज्योत दुसऱ्या पक्षातून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होऊ शकतात का, असे विचारले असता, मी म्हटले की, आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला देण्यासाठी पैसे नाहीत.” मात्र, हे स्पष्टीकरण निष्प्रभ ठरले आणि पक्षाने तातडीने कारवाई केली.
विरोधकांकडून काँग्रेसवर हल्लाबोल
नवज्योत कौर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले. भाजप आणि आम आदमी पार्टी (AAP) सह सर्व विरोधी पक्षांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या विधानामुळे काँग्रेसच्या कामकाजाचे ‘कठोर सत्य’ समोर आले आहे.
रवनीत सिंह बिट्टूंचा हल्ला
केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी नवज्योत कौर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “माझे आजोबा मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये असे प्रकार घडत नव्हते, पण आता गेल्या काही वर्षांपासून आम्ही हे सर्व ऐकत आहोत,” असे ते म्हणाले. “याच कारणामुळे माझ्यासारख्या लोकांनी पक्ष सोडला,” असेही बिट्टू यांनी स्पष्ट केले.
बिट्टू यांनी काँग्रेसच्या अंतर्गत कारभारावर टीका करताना म्हटले, “मला वाटत नाही की काँग्रेस पक्ष कधी या प्रकरणाची चौकशी करेल. तेथे एक मुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही पैशाऐवजी गांधी कुटुंबाला मोजे आणि अंतर्वस्त्रे पाठवतो… तेथून यादी येईल आणि आम्ही सामान पाठवून देऊ.”
आम आदमी पक्षाने काय म्हटले ?
नवज्योत कौर यांच्या विधानावर सत्ताधारी आम आदमी पार्टीने भाष्य केले आहे. आपचे सरचिटणीस बलतेज पन्नू यांनी एक निवदन जारी करत म्हटले की, ‘नवज्योत कौर सिद्धू यांनी दोन स्फोटक दावे केले आहेत. पहिला दावा म्हणजे, जर काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले तरच ते पंजाबच्या राजकारणात सक्रीय होतील. दुसरा दावा म्हणजे सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत. याचा अर्थ असा की काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी 500 कोटी रुपये लागतात.
पुढे बोलताना पन्नू यांनी म्हटले की, ‘सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत, मग इतके पैसे कोणत्या नेत्याकडे आहेत? हे पैसे कुठे जातात? राज्य युनिट अध्यक्षांकडे? हायकमांडकडे? राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे? पंजाबच्या लोकांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.’