Priyanka Gandhi on Vande Mataram: लोकसभेत ‘वंदे मातरम’वर चर्चा की राजकारण? प्रियांका गांधींकडून भाजपची पोलखोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणार आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींनी समाचार घेतला आहे. लोकसभेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा म्हणाल्या की, वंदे मातरम हे गीत त्याच्या स्वत: च्या धैर्याची आठवण करून देते. वंदे मातरम हे राष्ट्राच्या आत्म्याचा भाग आहे. वंदे मातरमवरील चर्चा का आवश्यक आहे. असा सवाल उपस्थित केला. तसेच, सरकार जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. बंगालच्या निवडणुकांमुळे वंदे मातरमवरील वाद निर्माण केला जात असल्याचा आरोपही यावेळ प्रियांका गांधींनी केल.
Explainer: “वंदे मातरम्- राष्ट्रभावना की राजकीय अजेंडा?” इतिहासापासून वादापर्यंत जाणून घ्या सर्वकाही
सभागृहात भाजपवर निशाणा साधत प्रियांका गांधी म्हणाल्या, “आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. या सरकारला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर नवीन आरोप लादण्याची संधी हवी आहे. असे करून मोदी सरकार सार्वजनिक प्रश्नांवर दबाव आणण्यापासून देशाचे लक्ष विचलित करू इच्छित आहे.”
प्रियांका गांधींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंबद्दलही सरकारवर निशाणा साधला. “दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी आपले जीवन दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी १२ वर्षे तुरुंगात घालवली. त्यांनी इस्रो, डीआरडीओ, एम्स, आयआयटी आणि इतर संस्थांची स्थापना केली. त्यामुळे आता एक दिवस नेहरूंवर चर्चा व्हायला हवी. जर त्यांनी इस्रो बांधला नसता, तर आज आपल्याकडे मंगळयान नसते. काँग्रेसनेच वंदे मातरम’ गीताल राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला.
दरम्यान, प्रियांका गांधींचे भाषण सुरू असताना लोकसभेता मोठा गोंधळही माजल्याचे पाहायला मिळाले. पण त्याचवेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप करत प्रियांका गांधींना वंदे मातरमवर चर्चा करण्यास सांगितले. लो देशातील तरुण त्रस्त आहेत. देशातील महागाई आणि बेरोजगारी यावर चर्चा झाली पाहिजे, असही प्रियांका गांधींनी नमुद केलं.
काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा म्हणाल्या, “तुम्ही (भाजप) निवडणुकीसाठी आहात, आम्ही देशासाठी आहोत. आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आम्ही येथे बसून तुमच्याशी आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. आम्ही आमच्या देशासाठी लढत राहू. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही.” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही लोकसभेत वंदे मातरमवरील चर्चेत भाग घेतला. राजनाथ सिंह म्हणाले की, वंदे मातरम इतिहास आणि वर्तमानाशी जोडलेले आहे. वंदे मातरमने देशाला जागृत केले आहे. ते फक्त बंगालच्या निवडणुकांशी संबंधित नाही. वंदे मातरमने ब्रिटिश साम्राज्याला नमन केले आहे.






