'वंदे मातरम' माझ्यासाठी खूप प्रेरणादायक; वंदे मारतरच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ” १८७५ मध्ये बंकिमचंद्रांनी लिहिलेले, आनंदमठ मध्ये प्रकाशित झाले. भारताचे राष्ट्रगीत, वंदे मातरम, ७ नोव्हेंबर १८७५ रोजी अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले होते. ते पहिल्यांदा १८८२ मध्ये त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीचा भाग म्हणून त्यांच्या ‘बंगदर्शन’ मासिकात प्रकाशित करण्यात आले होते. १८९६ मध्ये, रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात व्यासपीठावर ‘वंदे मातरम’ गायले. हे गाणे पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर सार्वजनिकरित्या गाण्यात आले.
नरेंद्र मोदी म्हणाले, “जर आपण सर्वांनी याचा सुज्ञपणे वापर केला तर वंदे मातरम येणाऱ्या पिढ्यांसाठी मोठी प्रेरणा ठरू शकते. वंदे मातरमने स्वातंत्र्य चळवळीला ऊर्जा दिली आणि देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या लढ्याला दिशा दिली. जेव्हा वंदे मातरमला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश गुलामगिरीत होता. १०० वर्षे पूर्ण झाली तेव्हा देश आणीबाणीच्या बेड्यांमध्ये होता आणि संविधानाचा गळा दाबला गेला. देशभक्तांना तुरुंगात टाकण्यात आले. लोकसभेत वंदे मातरमवरील आजची चर्चा राष्ट्राला एकत्र करण्याची आणि पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा देईल.
मोदी म्हणाले की, “आपल्या सर्व खासदारांसाठी वंदे मातरम हा लढाई स्वीकारण्याचा पवित्र सण आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम – संपूर्ण देश वंदे मातरमच्या जयघोषाने एकत्र आला. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन देशाला सोबत घेऊन पुढे जायचे आहे. स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार करण्यासाठी वंदे मातरम प्रेरणा ठरू दे.”
Panjab Politics: ५०० कोटींची ‘सुटकेस’ दिली तरच मुख्यमंत्रीपद? काँग्रेसवर कोणी केले गंभीर आरोप
जगाच्या इतिहासात वंदे मातरमसारखे भावनिक गीत क्वचितच आहे. महात्मा गांधींच्या संदर्भाचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, गांधींच्या भावनांनाही वादात ओढण्यात आले. मोदींनी इतिहासातील घटनांचा दाखला देत आरोप केला की, तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी वंदे मातरमच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतली नाही. “नेहरूंनी ना स्वतःची निष्ठा व्यक्त केली, ना मुस्लिम लीगचा तीव्र निषेध केला; उलट वंदे मातरमची चौकशी सुरू केली,” असा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, १५ ऑक्टोबर १९३७ रोजी लखनौ येथे मोहम्मद अली जिना यांनी ‘वंदे मातरम’ घोषणेला विरोध केला, त्यानंतर तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांनी आक्रमक भूमिका न घेत, उलट तपासणीची भूमिका स्वीकारली. नेहरूंनी मुस्लिम लीगच्या विधानांना स्पष्ट उत्तर दिले नाही, त्यांचा निषेधही केला नाही; उलट वंदे मातरमची चौकशी सुरू केली.” ते पुढे म्हणाले की, जिन्नांच्या विरोधानंतर फक्त पाच दिवसांनी, म्हणजे २० ऑक्टोबर १९३७ रोजी, नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पत्र लिहून जिन्नांच्या भावनांशी सहमत असल्याचे दर्शविले. नेहरू पत्रात लिहितात, “मी वंदे मातरमची आनंदमठ पार्श्वभूमी वाचली आहे आणि ते मुस्लिमांना भडकवू शकते,” असे पंतप्रधानांनी सांगितले.






