
पाकिस्तानचा गेम ओव्हर! भारताचे मोठे यश; Pahalgam Terrorist Attack प्रकरणी एनआयएने थेट....
पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएने दाखल केली चार्जशीट
चार्जशीटमध्ये पाकिस्तानविरुद्ध पुरावे
८ महिन्यांनी दाखल केली विस्तृत चार्जशीट
नवी दिल्ली: जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये तब्बल २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. तसेच पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला. अखेर ८ महिन्यांच्या विस्तृत तपास केल्यावर एनआयएने चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये या हल्ल्यात असणारे हँडलर्स, मास्टरमाइंड्स, यांची नवे असून, पाकिस्तानविरुद्धचे पुरावे देखील यामध्ये दाखल केले गेले आहेत.
एनआयएने तब्बल १५९७ पानांची एक विस्तृत चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये पाकिस्तानसबंधित पुरावे देखील देण्यात आल्याचे समजते आहे. यामुळे पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीयस्तरावर बाजू मांडण्यास भारतास ताकद मिळणार आहे. जम्मू काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि तेथील लोकांना भडकवणे हे पाकिस्तानचे काम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे म्हटले जात आहे.
चार्जशीटमध्ये अनेक पुरावे जोडण्यात आले आहेत. ऑपरेशन महादेव अंतर्गत दोन अँड्रॉइड मोबाईल सापडले आहेत. ते पाकिस्तानमधून खरेदी केले गेले असल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध असल्याचे समोर आले आहे.तसेच काही शस्त्र देखील जप्त करण्यात आली आहेत. एनआयएने तबंबाळ ८ महिने तपास करून विस्तृत अशी चार्जशीट दाखल केली आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याचा गुन्हेगार कोण? एनआयएच्या आरोपपत्रात तीन नावे समोर
पाकिस्तानवर संकट कोसळण्याची शक्यता
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं मोठा निर्णय घेत सिंधू जल करार रद्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, भारताने घेतलेल्या निर्णयासंदर्भात अहवाल समोर आलाय. त्यात जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखून ठेवले तर पाकिस्तानची बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पाकिस्तानला प्रचंड भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागू शकते. तसेच, पाकिस्तानच्या शेजारील देशांची पाणी साठवायची क्षमता कमी असून त्याचा परिणाम कृषी, वीजनिर्मिती या क्षेत्रावर होऊ शकतो.
Delhi Bomb Blast प्रकरणात ‘एनआयए’ची मोठी कारवाई; 4 आरोपींना थेट….; नेमका विषय काय?
पाकिस्तानची शेती ८० टक्के सिंधू नदीवर अवलंबून असल्याने सिंधू जल करार स्थगित करणं पाकिस्तानसाठी हा धक्का मोठा समजला जात आहे. सिंधू, झेलम आणि चिनाब नद्यांच्या प्रवाहात भारताच्या निर्णयामुळे मोठी घट झाली असून, नद्यांमधील पाणीसाठा कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही धोक्याची घंटा आहे. इकोलॉजिकल थ्रेट रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सद्यस्थितीला असलेले धरण केवळ ३० दिवस सिंधू नदीचा प्रवाह रोखू शकते. त्यामुळे भारताच्या निर्णयामुळे पाकिस्तानची गोची झाल्याचे दिसून येत आहे.