आता गव्हाच्या किमतीही वाढताहेत; सहा महिन्यात तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी झाली वाढ

सध्या बाजारात गव्हाला सुगीचे (Wheat Prices) दिवस आले आहेत, गव्हाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील सहा महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात गव्हाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.

    नवी दिल्ली : सध्या बाजारात गव्हाला सुगीचे (Wheat Prices) दिवस आले आहेत, गव्हाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागील सहा महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात गव्हाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. सध्याचे गव्हाचे दर पाहता देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीने आठ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे.

    दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने विविध उपाययोजना केल्या. मात्र, ते आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. दर नियंत्रित करण्यासाठी सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता देशांतर्गत बाजारातील किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकार गव्हाच्या आयातीवरील सुत्क काढून टाकण्याचीही शक्यता आहे. दिल्लीतील गहू 1.6 टक्क्यांनी वाढून 27 हजार 390 रुपये प्रति मेट्रिक टनावर पोहोचला आहे. जो 10 फेब्रुवारी 2023 नंतरची सर्वोच्च किंमत आहे.

    साखर निर्यातीवर लावली बंदी

    केंद्र सरकारने साखर निर्यातीवरील बंदी 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. मात्र, कोट्‌यातील युरोपियन युनियन आणि यूएसएला साखर निर्यातीवर बंदी लागू झालेली नाही. साखरेच्या निर्यातीवरील बंदी वाढवण्याच्या निर्णयाकडे देशांतर्गत दर स्थिर ठेवण्याचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2023 रोजी साखर 41.45 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होती. ज्याची किंमत 10 ऑक्टोबर 2023 रोजी 43.84 रुपये प्रति किलो झाली आहे.