देशात पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी अंडरग्राउंड बुलेट ट्रेन (Bullet Train) सुरु करण्यात येणार आहे. यासाठी समुद्राखाली सात किलोमीटर लांबीचा बोगदा हा बांधण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा येथील भूमिगत स्थानकादरम्यान हा भुयारी मार्ग (Undergroud Tunnel) बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे.
[read_also content=”नवरात्र उत्सवासाठी श्री महालक्ष्मी मंदिर सज्ज; कडेकोट बंदोबस्तात असणार सीसीटीव्हीची नजर https://www.navarashtra.com/maharashtra/shree-mahalakshmi-temple-mumbai-ready-for-navratri-festival-cctv-will-be-under-strict-security-nrvb-329104.html”]
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी (Mumbai-Ahmedabad High Speed Rail Corridor) 21 किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामधील सात किलोमीटर भुयारी मार्ग समुद्राच्या तळाशी असेल. नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉरपोरेशनने यासाठी टेंडरही मागवण्यात आले आहे.
[read_also content=”उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/bike-rider-dies-after-hitting-flyover-curb-at-nalstop-chowk-pune-329105.html”]