delhi news
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या रुग्णालयातील महिला डॉक्टरसह 7 जणांना अटक केली आहे. बांगलादेशपासून राजस्थानपर्यंत चालवण्यात येणाऱ्या या किडनी रॅकेटला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या महिला डॉक्टरने 15 ते 16 ऑपरेशन केले होते. अवैध मानवी किडनीचा हे संपूर्ण रॅकेट बांगलादेशातून चालवले जात होते. पण ऑपरेशन्स भारतात होत होत होते. राजस्थान पोलिसांनी बांगलादेशच्या या रॅकेटबाबत महत्त्वाचे खुलासे केले केल्यानंतर दिल्ली पोलिसांची क्राइम ब्रँचनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. दिल्ली क्राईम ब्रांचने केलेल्या तपासात एका मोठ्या रुग्णालयातील महिला डॉक्टरने नोएडा येथील रुग्णालयात 15 ते 16 प्रत्यारोपण केले होते.
या अवैध धंद्याचे पैसे या महिला डॉक्टरच्या खासगी सहाय्यकाच्या खात्यात यायचे आणि महिला डॉक्टर ते रोखीने काढत होती, असा आरोप आहे. यासाठी बांगलादेशातील रॅकेटचे लोक डायलिसिस सेंटरमध्ये जाऊन कोणत्या रुग्णाला किडनीची गरज आहे आणि त्याची क्षमता किती आहे हे पाहायचे. एखादा रुग्ण 25 ते 30 लाख रुपये द्यायला तयार झाला की त्याला भारतीय वैद्यकीय संस्थेमार्फत उपचारासाठी भारतात पाठवले जायचे.
त्यानंतर या रॅकेटचे लोक काही गरीब बांगलादेशींना पकडून पैशाचे आमिष दाखवून किडनी दान करण्यास तयार करायचे. मग ते त्यांनाही फसवून भारतात आणायचे आणि किडनीची गरज असलेल्या रुग्णाला आपले नातेवाईक म्हणायचे. त्यानंतर त्या व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून महिला डॉक्टरांच्या मार्फत त्याची किडनी काढली जायची.
या महिला डॉक्टरला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार दिवसांपूर्वी दिल्लीतूनच अटक केली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अपोलो रुग्णालयाने महिला डॉक्टरला निलंबित केले आहे. तसेच काही देणगीदारांनी त्यांना नोकरीच्या नावाखाली भारतात आणले आणि नंतर त्यांची किडनी येथे काढण्यात आल्याचेही सांगितले.
महिला डॉक्टरची भूमिका समोर आल्यानंतर अपोलो रुग्णालयाकडून याप्रकरणी निवेदन जारी करण्यात आले आहे. महिला डॉक्टरची नियुक्ती रुग्णालयाच्या वेतनावर नसून तिच्या सेवेच्या बदल्यात शुल्काच्या आधारे करण्यात आली होती, असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. डॉक्टरांची सेवा निलंबित करण्यात आली आहे. हे काम अन्य कुठल्यातरी रुग्णालयातील महिला डॉक्टरने केल्याचेही रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. प्राथमिक तपासात, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल (IAH) मध्ये असे कोणतेही कृत्य घडलेले नसल्याचे समोर आले आहे.