अमेरिकन एअरलाइन्सच्या (American airlines) न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये (New York New Delhi) एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या घटनेतील आरोपी हा दिल्लीकी रहिवासी असुन तो अमेरिकन विद्यापीठाचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. आर्य वोहरा (Arya Vohara) असं त्याच नाव आहे.
[read_also content=”फेसबुकवर रिल्स तयार करता तुम्ही! मग हे” नवीन फीचर आहे तुमच्या कामाचं, आता बनवा 90 सेकंदांपर्यंत रिल्स https://www.navarashtra.com/latest-news/facebook-users-can-creat-reel-on-facebbok-up-to-90-seconds-creative-expression-features-launch-by-facebook-nrps-374052.html”]
न्युयार्कहून (New York) नवी दिल्लीला जाणाऱ्या (Delhi) अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना फ्लाइट क्रमांक AA292 मध्ये घडली, ज्याने शुक्रवारी रात्री 9.16 वाजता न्यूयॉर्कहून उड्डाण केले आणि शनिवारी सकाळी 10.12 वाजता येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. याबद्दल अधिक माहिती देताना आयजीआय विमानतळ डीसीपी म्हणाले की, आम्हाला अमेरिकन एअरलाइन्सकडून युएसएमधील विद्यार्थी आणि दिल्लीतील डिफेन्स कॉलनी येथील रहिवासी आर्य वोहरा या व्यक्तीविरुद्ध लघवी केल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. आम्ही आवश्यक कायदेशीर कारवाई करत आहोत.
मिळालेल्या माहितीनुसार, तो आरोपी मद्यधुंद अवस्थेत होता आणि झोपेत त्याने कपड्यांवर लघवी केली, त्यामुळे त्याच्या शेजारी बसलेला प्रवासीही ओला झाला. त्यानंतर प्रवाशाने क्रूकडे तक्रार केली. आरोपी विद्यार्थ्याने माफी मागितल्यानंतर पीडित प्रवाशाने या प्रकरणाची पोलिसात तक्रार नोंदवली नाही कारण असे केल्याने आरोपीचं करिअर धोक्यात आले असतं.
दरम्यान, विमानातील क्रूला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी वैमानिकाला याची माहिती दिली ज्याने एटीसीला ही बाब कळवली, त्यांनी सीआयएसएफ कर्मचार्यांना याबद्दल कळवल्यानंतर, त्यांनी आरोपी प्रवाशाला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी सीआयएसएफसह एअरलाइनचे स्वतःचे सुरक्षा पथक हजर होते. विमान उतरताच आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी आता पोलिस संबंधितांचे जबाब नोंदवत आहेत.