PM Modi Live: आखाती देशांतील युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम...; नरेंद्र मोदी लोकसभेत काय म्हणाले?
PM Modi Live: पश्चिम आशियात युद्धामुळे परिस्थिती खूपच बिघडली आहे. या संकटाला तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. आखाती देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांवर वाईट परिणाम होत आहेत. या युद्धामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धामुळे भारतासमोरही मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. या युद्धाचा भारताच्या नागरिकांसह अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहेत.” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली.
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले युद्ध एका अत्यंत धोकादायक वळणावर पोहोचले आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील सततच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेश रणांगणात बदलला आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, या संघर्षाचा आता २४ वा दिवस उजाडला असून, त्यामुळे केवळ प्रादेशिक तणावच वाढत नाही, तर जागतिक तेल आणि ऊर्जा पुरवठ्यावरही त्याचा स्पष्ट परिणाम होत आहे. यासंदर्भात आज नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत युद्धासंदर्भात भाष्य केलं.
इराण आणि इस्रायल यांच्यातील हल्ल्यांची मालिका कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, इराणदेखील आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहे. या सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे संपूर्ण पश्चिम आशियामध्ये अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
जेव्हापासून हे युद्ध सुरू झाले आहे, तेव्हापासून अनेक देशांतील भारतीय नागरिकांवर परिणाम होत आहेत. पण युद्ध प्रभावित देशांतील देशांत राहणाऱ्या राष्ट्राध्यक्ष आणि नेत्यांशी फोनवरून चर्चा केली आहे. त्या सर्वांनी भारतीय नागरिकांचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले आहे. युद्धाला सुुरुवात झाल्यापासून युद्धदेशात अडकलेले तब्बल साडेतीन लाखांहून अधिक भारतीय नागरीक सुरक्षितरित्या भारतात पोहचले आहेत.
या संघर्षात काही लोकांचा मृत्यू झाला आहे आणि काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहोत आणि त्यांनाही मदत पुरवली जात आहे. आमची दूतावास तेथे राहणाऱ्या भारतीयांना आवश्यक मदत पुरवत आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणि खते मिळतात. पेट्रोल आणि एलपीजीचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. देश आपल्या गरजेच्या ६० टक्के आयात करतो. कच्चे तेल आणि खते यांसारख्या जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून देशात येतात. युद्धामुळे या भागातून जहाजांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. असे असूनही, होर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे देशात तेल आणि वायूचे संकट निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हे संकट कमी करण्यासाठी, २७ देशांकडून होणारी आयात आता ४१ देशांपर्यंत वाढली आहे.






