
वाराणसीच्या भूमीतून पंतप्रधान मोदींचा नारी शक्तीला शब्द (Photo Credit- X)
आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान म्हणाले की, “आमची काशी ही माता श्रृंगार गौरी, अन्नपूर्णा, विशालाक्षी आणि गंगा मातेच्या दिव्य शक्तींची भूमी आहे. आज या समागमाला माता-भगिनींनी उपस्थित राहून या प्रसंगाला अधिक दिव्य बनवले आहे. काशीचा खासदार आणि देशाचा पंतप्रधान म्हणून मला देशहिताचे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.” यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला.
#WATCH वाराणसी, उत्तर प्रदेश: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, “हमारी सरकार की नीतियों में निरंतर महिला कल्याण को सर्वोच्च प्राथमिकता दी गई है। 2014 में आपने हमें सेवा का अवसर दिया तो देश में 12 करोड़ से ज्यादा शौचालय बने। 30 करोड़ से ज्यादा बहनों के बैंक खाते खुले। 2.5 करोड़ से… pic.twitter.com/3uM9ZGie9g — ANI_HindiNews (@AHindinews) April 28, 2026
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांनी काँग्रेस, सपा, टीएमसी आणि डीएमके यांसारख्या विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, “हे परिवारवादी आणि तुष्टीकरण करणारे पक्ष नारी शक्तीला घाबरलेले आहेत. ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या मुली, ज्या आज स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेतृत्व करत आहेत, त्या विधानसभा आणि संसदेत पोहोचल्या तर या घराणेशाही चालवणाऱ्या पक्षांचे नियंत्रण संपुष्टात येईल, ही भीती त्यांना सतावत आहे.” गेल्या ४० वर्षांपासून महिलांचे अधिकार लटकवून ठेवणाऱ्यांनी पुन्हा एकदा या कायद्याला ‘लाल झेंडा’ दाखवल्याची टीका त्यांनी केली.
केंद्र सरकारच्या योजनांच्या केंद्रस्थानी महिला असल्याचे सांगत मोदींनी आकडेवारी सादर केली. २०१४ पासून आतापर्यंत:
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी दोन नवीन ‘अमृत भारत एक्सप्रेस’ गाड्यांना हिरवा कंदील दाखवला. यामध्ये बनारस-पुणे (हडपसर) आणि अयोध्या-मुंबई (एलटीटी) या गाड्यांचा समावेश आहे. “या गाड्यांमुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी अधिक सुधारेल. आता मुंबई आणि पुणेकरांना अयोध्या धाम तसेच काशी विश्वनाथ धामला पोहोचण्यासाठी एक आधुनिक आणि जलद पर्याय उपलब्ध झाला आहे,” असे मोदींनी नमूद केले.