PM Narendra Modi Celebrate 11th international yoga day 2025 in visakhapatnam
नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक इतिहास आणि विज्ञान यामधील योग साधना ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे. संपूर्ण जगाला भारताने योगसाधनेचे योगदान दिले आहे. निरोगी शरीर आणि मानसिक आरोग्यासाठी जागतिक पातळीवर 21 जून हा योग दिन साजरा केला जातो. 11 वा जागतिक योग म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील विषाखापट्टनम येथे योगासने करुन योगा दिन साजरा केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषाखापट्टणम येथे योगा दिन साजरा केला आहे. त्यांच्यासह हजारो लोक हे योगा करताना दिसून आले. योग साधनेमधील विविध आसने आणि ध्यानधारणा करताना पंतप्रधान मोदी दिसून आले. यावेळी तणाव, अशांतता आणि अस्थिरतेतून जात असलेल्या संपूर्ण विश्वाला योगामधून शांतता मिळेल असा विश्वास देखील पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.
Yoga isn’t just an exercise. It is a way of life. Wonderful to join this year’s Yoga Day celebrations in Visakhapatnam. https://t.co/ReTJ0Ju2sN
— Narendra Modi (@narendramodi) June 21, 2025
योगसाधना झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी योगाचे आणि भारतीय विद्येचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या जगामध्ये तणाव आणि अशांतता दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक देशांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा सर्व परिस्थितीमधून योग साधना हा उत्तम मार्ग दाखवू शकतो. योग हा शांततेचा मार्ग दाखवणारा आहे. योग साधना असे बटण आहे की, ज्याने मानवासा श्वास घेण्यासाठी, संतुलन ठेवण्यासाठी आणि याचा समन्वय राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. योग साधना नव्या जोम्याने कामाला लागण्यासाठी क्षणभर विश्रांती देते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज 11 व्यांदा संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जात आहे. गोगचा साथा अर्थ होतो जोडले जाणे, योगमुळे संपूर्ण विश्वाला जोडते आहे. हे पाहणे सुखद आहे. मी दशकभरापासून योग दिनाच्या पात्रेला पाहतो, तेव्हा खूप काही आठवणी डोळ्यासमोर येतात. संयुक्त राष्ट्रात जेव्हा भारताने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जावा, असा प्रस्ताव मांडला तेव्हा कमीत कमी वेळात १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला या प्रस्तावासाठी झालेली एकजूट ही काही सामान्य घटना नव्हती. हा फक्त एका प्रस्तावाला समर्थन देण्याचा विषय नव्हता, तर मानवतेसाठी केलेला हा एक सामूहिक प्रयत्न होता,” असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जगाला माझी विनंती आहे की, हा योग दिनाच्या निमित्ताने मानवतेसाठी पुन्हा नव्याने 2.O अशी सुरुवात करुया. यामध्ये आंतरिक शांतता हे जागतिक धोरण बनू शकेल. संपूर्ण जगासमोर लठ्ठपणाच्या समस्येचे आव्हान उभे राहिले आहे. मन की बात या कार्यक्रमातही मी यावर मत मांडले होते. आपल्या जेवणातून 10 टक्के तेल कमी करण्याचे चॅलेंज मी दिले होते. मी पुन्हा एकदा देश आणि जगातील लोकांना हे आव्हान देतो आहे. आपल्या जेवणातून आपण १० टक्के तेल कसे कमी करू शकू? याबाबत जागरुकता निर्माण करावी लागेल,” असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने केले आहे.