Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal मुळे पंतप्रधान मोदींचा हार घालून सत्कार; संसदेमध्ये NDA खासदारांचा मोठा उत्साह

India-US Trade Deal : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील १८% कर कपातीची घोषणा केली आहे. यामुळे सत्ताधारी भाजप खासदारांनी केंद्र सरकारचे अभिनंदन करुन पंतप्रधानांना हार घातला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 03, 2026 | 12:41 PM
PM Narendra Modi felicitated with garlands by NDA MP for India-US Trade Deal

PM Narendra Modi felicitated with garlands by NDA MP for India-US Trade Deal

Follow Us
Follow Us:
  • भारत अमेरिका व्यापार करारामुळे NDA खासदार खुश
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केला सत्कार
  • संसदेच्या आवारात पंतप्रधान मोदींना घातला हार
India-US Trade Deal : नवी दिल्ली : भारताच्या व्यापार वर्गासाठी सध्या दिवाळ सण आला आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे भारताला (India America Relations) मोठा फायदा होत आहे. अमेरिका-भारत व्यापार कराराचा एक भाग म्हणून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील १८% कर कपातीची घोषणा केली आहे. यामुळे सत्ताधारी भाजप खासदारांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) हार घालून त्यांचे कौतुक केले.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे बजेट सादर केले. यानंतर लोकसभेमध्ये जोरदार गदारोळ सुरु आहे. यानंतर आता भारत -अमेरिका व्यापार करारामुळे सत्ताधारी नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. सत्ताधारी खासदारांनी संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी अमेरिकी कराराबाबत अभिनंदन केले आहे. तसेच एनडीएच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हार घालून त्यांचा सत्कार केला आहे.

हे देखील वाचा : Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एनडीएच्या खासदारांनी व्यापारी करारामुळे भलामोठा हार घातला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदींना मोठा हार घातला. यावेळी गृहमंत्री अमित शाह, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार चिराग पासवान यांच्यासह एनडीए समर्थक खासदार उपस्थित आहेत. यावेळी सर्व खासदारांनी टाळ्यांच्या कडकडात नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

#WATCH | Delhi | NDA MPs felicitate PM Modi for the India-US trade agreement, at NDA Parliamentary party meeting in Parliament premises pic.twitter.com/M5nMRwggtn — ANI (@ANI) February 3, 2026

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर भारत आणि अमेरिकेने एक मोठा व्यापार करार अंतिम केला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी घोषणा केली की भारतावर लादलेले कर २५% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आले आहेत, जे तात्काळ लागू होतील. खरं तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ही चर्चा भारत आणि अमेरिका यांच्यातील सुरू असलेल्या उच्चस्तरीय संबंधांचा एक भाग मानली जाते, असे भारतातील अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियासाठीचे विशेष दूत सर्जियो गोर यांनी सांगितले आहे.

हे देखील वाचा :  Epstein Files चा धमाका! ईमेलमध्ये युवतींचा उल्लेख अन् ‘या’ देशाच्या सुरक्षा सल्लागारांनी दिला तडकाफडकी राजीनामा, जगभरात खळबळ

या व्यापारी कराराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले, “जेव्हा दोन प्रमुख अर्थव्यवस्था आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही एकत्र काम करतात, तेव्हा ते आपल्या लोकांना फायदेशीर ठरते आणि परस्पर फायदेशीर सहकार्यासाठी असंख्य संधी उघडतात. जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे नेतृत्व आवश्यक आहे. शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देतो. आमची भागीदारी नवीन उंचीवर नेण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.” असे मोदींनी लिहिले आहे.

 

Web Title: Pm narendra modi felicitated with garlands by nda mp for india us trade deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • America news
  • Donald Trump
  • PM Narendra Modi
  • Tariff

संबंधित बातम्या

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?
1

Global Stock Market : शेअर बाजारात महामंदीची लाट येणार? जेफरीजच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ; काय आहेत धोके?

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी
2

Donald Trump: अमेरिका-कॅनडा व्यापारयुद्ध भडकणार? ट्रम्प यांची 1 जानेवारीपासून 50 टक्के टॅरिफची धमकी

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा
3

PM Narendra Modi: ‘भारताला प्रश्न नको होते…’ मोदी-ट्रम्प भेटीवर अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांचा धक्कादायक खुलासा

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चे उद्घाटन लांबणीवर; आता एकाच वेळी १६ स्थानके सुरू होण्याची शक्यता
4

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चे उद्घाटन लांबणीवर; आता एकाच वेळी १६ स्थानके सुरू होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.