Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mann ki baat today : “सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण नका करु…; PM मोदींचे ‘मन की बात’मधून आवाहन

Maan Ki Baat today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून आपले विचार मांडले. 132 व्या एपिसोडमधून पंतप्रधानांनी आखाती देशांतील युद्धावर भाषण केले.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 29, 2026 | 12:57 PM
PM Narendra Modi Mann Ki Baat 132nd Episode Live Today on war Marathi News

PM Narendra Modi Mann Ki Baat 132nd Episode Live Today on war Marathi News

Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बात प्रदर्शित
  • 132 वा मन की बात एपिसोड
  • कोविड-19 प्रमाणे एकजुट राहण्याचे आवाहन
Mann ki baat today : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये ते देशवासियांशी संवाद साधत असतात. यावेळी ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान मध्य-पूर्वेतील संकट (Iran Israel War) आणि देशातील सद्यस्थितीवर आपले विचार मांडले. पंतप्रधान म्हणाले की, भारताने कोविड-१९ महामारीसारख्या कठीण परिस्थितीचा सामना करून त्यावर मात केली आहे आणि त्याचप्रमाणे आपण या संकटावरही मात करू. पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) राजकीय पक्षांना कठीण काळात राजकारण न करण्याचा आणि एकजुटीने आव्हानांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला.

शेजारील देशांमध्ये भीषण युद्ध

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “गेल्या महिनाभरापासून आपल्या शेजारी भीषण युद्ध सुरू आहे. लाखो भारतीय कुटुंबांचे नातेवाईक या देशांमध्ये राहतात, विशेषतः आखाती देशांमध्ये काम करणारे. ते १० दशलक्षाहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत पुरवत आहेत. त्यांनी देशवासियांना सतर्क राहण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले. तसेच या परिस्थितीमध्ये राजकारण न करण्याचे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, “जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे संकट निर्माण होत आहे. आव्हाने असूनही, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत अधिक भक्कम स्थितीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “भारताचे जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळणारी मदत आणि गेल्या एका दशकात देशाने विकसित केलेली क्षमता यामुळेच भारत या आव्हानांचा ठामपणे सामना करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

हे देखील वाचा : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य

हा काळ कठीण असल्याचे नमूद करत, पंतप्रधान मोदींनी जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन केले. “हा निःसंशयपणे एक आव्हानात्मक काळ आहे. मी पुन्हा एकदा देशवासीयांना आवाहन करतो की, त्यांनी एकजूट होऊन या आव्हानावर मात करावी. मला खात्री आहे की, ज्याप्रमाणे आपण यापूर्वीच्या संकटांवर नेहमीच मात केली आहे—देशातील १४० कोटी नागरिकांच्या सामूहिक शक्तीच्या बळावर—त्याचप्रमाणे, यावेळीही आपण या कठीण परिस्थितीवर मोठ्या यशाने मात करू,” असेही ते पुढे म्हणाले आहेत.

पुढे पंतप्रधान मोदींनी आयपीएल वर देखील भाष्य केले. ते म्हणाले की, देशभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा महिना उत्साह आणि आनंदाने भरलेला होता. जेव्हा भारताने टी-२० विश्वचषकात ऐतिहासिक विजय मिळवला, तेव्हा देशभरात आनंदाची लाट पसरली. त्यांनी देशवासियांना या उल्लेखनीय कामगिरीचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. 

हे देखील वाचा  : रेल्वे पोलिसांची मोठी कामगिरी! ५ वर्षांत ५२,४९४ आरोपी अटकेत; ड्रोन, CCTVसह गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी अस्मिता ॲथलेटिक्स लीगचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त या लीगमध्ये अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात अंदाजे दोन लाख मुलींनी सहभाग घेतला होता. देशातील क्रीडा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यात भारताची महिला शक्ती महत्त्वाची भूमिका बजावत आहे, हे पाहून आनंद होतो, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून व्यक्त केल्या आहेत.

 

 

Web Title: Pm narendra modi mann ki baat 132nd episode live today on war marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल
1

मागील 12 वर्षापासून लाल किल्ल्यावरून खोटी आश्वासने देण्याचा सपाटा, आतापर्यंत केलेल्या घोषणांचे काय झाले? सपकाळांचा सवाल

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
2

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष
3

India-Bangladesh : शेख हसीनांच्या प्रत्यार्पणावर होणार मोठा निर्णय? पंतप्रधान मोदी आणि तारिक रहमान यांच्या भेटीकडे जगाचे लक्ष

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
4

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.