नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) हे आज महाराष्ट्र दौ ऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये (Kalaram Temple) दर्शन घेत गोदावरीच्या तिरावर पूजाअर्चना देखील केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (National Youth Festival) उद्धाटन केले. यावेळी त्यांनी नाशिकमधील तरुणांशी संवाद साधत भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली. भारत माताच्या जयघोष करत तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला.
पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमधील आपल्या भाषणाची मराठी भाषेत सुरुवात करत सर्वांना सुखद धक्का दिला. राजमाता जिजाऊ यांची आज जयंती असल्यामुळे त्यांना मराठीमध्ये मोदी यांनी अभिवादन केले. . “राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिवशी वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीर भूमित येण्याची संधी मिळाली, याचा मला अतिशय आनंद आहे. मी माँ जिजाऊ साहेबांना कोटी कोटी वंदन करतो. माँ जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवलं,” असं पंतप्रधान मोदी यांनी भाषणामध्ये म्हटले आहे.
त्याचबरोबर भाषणामध्ये पंतप्रधानांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री असे विशेषण लावून केले. मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा केलेला उल्लेख लक्षवेधी ठरला आहे.






