Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी मरणार नाही..’; व्हिडीओ जारी करत Sonam Wangchuk यांचे देशाला आवाहन

Sonam Wangchuk Protest : सरकारला संदेश देण्यासाठी आणि येथे एकत्र येण्यासाठी सर्वांनी २० जुलै रोजी मोठ्या संख्येने एकत्र यावे. मी सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना विनंती करतो की, त्यांनी तो दिवस नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) अनुभवात्मक शिक्षणाचा दिवस म्हणून साजरा करावा.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 09:49 AM
Sonam Wangchuk Protest Video, Sonam Wangchuk Hunger Strike Day 19

Sonam Wangchuk Protest Video, Sonam Wangchuk Hunger Strike Day 19

Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे.
  • मी खाल्लं तरी त्यातून काय संदेश जाईल? सरकारला हा संदेश जाईल की, उत्तरदायित्वाची काही गरज राहिली नाही.
  • माझी प्रकृती अशी नाही की मी दोन-चार दिवसांत मरेन. माझ्या अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. १८ दिवसांच्या उपवासानंतर माझी प्रकृती सामान्य आहे.
 

Sonam Wangchuk Protest Video:  कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात देशाचे वैज्ञानिक, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे चिंता वाढत चालली आहे. देशभरातील लोक, नेते आणि अभिनेते त्यांना भेट देत आहेत आणि त्यांची खालावलेली प्रकृती पाहून त्यांना उपोषण सोडण्याचा आग्रह करत आहेत.

काय म्हटलं आहे सोनम वांगचुक यांनी?

दरम्यान, सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्यांनी जनतेला एक विशेष आवाहन केले आहे. आपल्या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “नमस्कार मित्रांनो, खूप मुश्लिकीलीने माझ्या उपोषणाच्या १८ व्या दिवशी मी तुमच्याशी जेमतेम संपर्क साधू शकत आहे. मला तुमच्याकडून हजारो संदेश येत आहेत, ज्यात तुम्ही मला उपोषण सोडून काहीतरी खाण्यास सांगत आहात. ज्येष्ठ आणि नेते आपले मत मांडत आहेत. काही जण प्रेमाने बोलत आहेत, काही जण रागाने, आणि काहींनी तर सरकारला मला खाण्यास भाग पाडण्यासाठी न्यायालयात अपील केले आहे.”

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

उपोषण न सोडण्याची मुख्य कारणे

त्यांनी उपोषण न सोडण्यामागे दोन मुख्य कारणे सांगितली. तो म्हणाला, “दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, मी खाल्लं तरी त्यातून काय संदेश जाईल? सरकारला हा संदेश जाईल की, उत्तरदायित्वाची काही गरज राहिली नाही. ते फक्त येतात, बसतात आणि निघून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे, माझी प्रकृती अशी नाही की मी दोन-चार दिवसांत मरेन. माझ्या अनेक वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. १८ दिवसांच्या उपवासानंतर माझी प्रकृती सामान्य आहे. आज माझा ईसीजीसुद्धा झाला. वैद्यकीय अहवाल फारसा वाईट नाही, त्यामुळे मी काही दिवस चालू शकेन. मी अशक्त आहे, माझे स्नायू साथ देत नाहीत, पण माझे हृदय अजूनही काम करत आहे.

 

सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना आवाहन

सोनम वांगचुक यांनी जनतेला आवाहन केले, “त्यामुळे तुम्हाला उपवास सोडायला सांगण्याऐवजी, मी तुम्हाला एक छोटे पाऊल उचलण्याची विनंती करतो. सरकारला संदेश देण्यासाठी आणि येथे एकत्र येण्यासाठी सर्वांनी २० जुलै रोजी मोठ्या संख्येने एकत्र यावे. मी सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांना विनंती करतो की, त्यांनी तो दिवस नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) अनुभवात्मक शिक्षणाचा दिवस म्हणून साजरा करावा. त्या दिवशी, मुलांना राज्यशास्त्राचा एक अनोखा धडा, इतिहासाचा एक भाग शिकायला मिळेल आणि लोकशाही कशी कार्य करते हे शिकता येईल.”

History of Hunger Strikes: भारतातील उपोषणाचा इतिहास: भगतसिंगांपासून सोनम वांगचूकपर्यंत देशातील ऐतिहासिक आंदोलने

सोनम वांगचुक यांनी देशातील लोकांना २० जुलै रोजी उपवासात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यांनी आवाहन केले, “मी तुम्हाला आग्रह करतो की, तुम्ही २० जुलै रोजी अनेक खासदारांसोबत हजारोच्या संख्येने जंतर मंतर येथे या. जर आपण सर्वांनी मिळून हा मुद्दा संसदेत आणला, तर मला खात्री पटेल की तो योग्य हातात आहे. त्याआधी, तुम्ही येत आहात हे कळवण्यासाठी मिस कॉल देऊ शकता आणि वेबसाइटवर तुमचे नाव नोंदवू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्ही हे कराल. तुम्ही येत आहात हे कळवण्यासाठी 7011670115 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. जय हिंद.”

सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली

सोनम वांगचुक यांचे १८ दिवसांच्या उपोषणादरम्यान ८.५ किलोग्रॅम वजन कमी झाले आहे. त्यांचा रक्तदाब १०७/७० mmHg पर्यंत खाली आला आहे, तर रक्तातील साखरेची पातळी ६७ मिलीग्रॅम प्रति डेसिलिटरपर्यंत घसरली आहे. कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनी केंद्र सरकारला आंदोलकांच्या मागण्यांवर लवकरात लवकर विचार करण्याचे आवाहन केले आहे.

I’m Not in good shape but not so bad either…
Rather than asking me to break my fast please join me on 20th July… Peaceful March to the Parliament.#cockroachjanataparty #jantarmantar #cjpprotest #chalosansad pic.twitter.com/QZ6VyxVMAR
— Sonam Wangchuk (@Wangchuk66) July 15, 2026

Web Title: Sonam wangchuk releases emotional video from jantar mantar explains reasons for not ending fast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Delhi news
  • hunger strike
  • National Politics
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन
1

Atul Kulkarni : सोनम वांगचुक यांच्यासाठी अतुल कुलकर्णींचं मोठं पाऊल! करणार एकदिवसीय उपोषण; सरकारला चर्चेसाठी केलं आवाहन

Sayaji Shinde on Sonam Wangchuk : ‘खऱ्या रॅन्चोसाठी…’ सयाजी शिंदे यांची सोनम वांगचुक यांना       विनंती! सरकारला पाजले धडे
2

Sayaji Shinde on Sonam Wangchuk : ‘खऱ्या रॅन्चोसाठी…’ सयाजी शिंदे यांची सोनम वांगचुक यांना विनंती! सरकारला पाजले धडे

History of Hunger Strikes: भारतातील उपोषणाचा इतिहास: भगतसिंगांपासून सोनम वांगचूकपर्यंत देशातील ऐतिहासिक आंदोलने
3

History of Hunger Strikes: भारतातील उपोषणाचा इतिहास: भगतसिंगांपासून सोनम वांगचूकपर्यंत देशातील ऐतिहासिक आंदोलने

Sonam Wangchuk Hunger Strike:सोनम वांगचूक यांचे उपोषण जबरदस्तीने तोडले जाऊ शकते का, काय आहे नियम?
4

Sonam Wangchuk Hunger Strike:सोनम वांगचूक यांचे उपोषण जबरदस्तीने तोडले जाऊ शकते का, काय आहे नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.