Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; शुभेच्छांची देवाणघेवाण

राष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा; पीएम मोदींनी 'INS विक्रांत'वर जाऊन नौदल जवानांसोबत साजरी केली दिवाळी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 20, 2025 | 07:53 PM
दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट (Photo Credit- X)

दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली
  • दिवाळीच्या दिल्या सदिच्छा!
  • सैनिकांसोबत साजरा केला सण

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिवाळीच्या पावन पर्वावर राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती मुर्मू यांनी या भेटीबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.”

Prime Minister Narendra Modi met President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan (Source: Rashtrapati Bhavan) pic.twitter.com/sd9A36waCW — IANS (@ians_india) October 20, 2025

Narendra Modi : ‘हा क्षण संस्मरणीय आहे…’, नौदलासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आयएनएस विक्रांतवर दाखल

राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “दिवाळीच्या या पावन पर्वावर मी भारत आणि जगभरातील सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.” राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, “हा आनंदाचा सण आत्म-चिंतन आणि आत्म-सुधारणेची संधी देखील आहे. हा सण वंचित आणि गरजूंना मदत करण्याची आणि त्यांच्या जीवनात आनंद आणण्याची संधी देतो. मी सर्वांना सुरक्षित, जबाबदारीपूर्वक आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करते. ही दिवाळी सर्वांसाठी सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो.”

पीएम मोदींनी सैनिकांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीही सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची त्यांची परंपरा कायम ठेवली. यावर्षी पंतप्रधान मोदींनी गोवा आणि कारवारच्या किनाऱ्याजवळ असलेल्या ‘INS विक्रांत’ या विशाल युद्धनौकेला भेट दिली. पंतप्रधान मोदींनी नौदल जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत प्रकाशाचा सण साजरा करण्याचे सौभाग्य लाभले, असे सांगितले. जवानांना संबोधित करताना ते म्हणाले, “आज माझ्या एका बाजूला अनंत क्षितीज, अनंत आकाश आहे आणि दुसऱ्या बाजूला अनंत शक्तीचे प्रतीक असलेला हा विशालकाय INS विक्रांत आहे. समुद्राच्या पाण्यावर सूर्यकिरणांची चमक शूर जवानांनी लावलेल्या दिवाळीच्या दिव्यांसारखी आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देणार आंध्र प्रदेशला भेट; 13430 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन

Web Title: Prime minister modi meets president on the occasion of diwali exchange of greetings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • Diwali
  • Hindu Festival
  • PM Narendra Modi
  • President Droupadi Murmu

संबंधित बातम्या

फटाक्यांच्या धुराने बिघडेल फुफ्फुसांची अवस्था, स्वामी रामदेव बाबांनी रेस्परेटरी सिस्टिम बनविण्यासाठी दिल्या सोप्या टिप्स
1

फटाक्यांच्या धुराने बिघडेल फुफ्फुसांची अवस्था, स्वामी रामदेव बाबांनी रेस्परेटरी सिस्टिम बनविण्यासाठी दिल्या सोप्या टिप्स

PM Modi Diwali Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरी नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी; पहा खास फोटो
2

PM Modi Diwali Celebration: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साजरी नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी; पहा खास फोटो

Diwali 2025: दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत
3

Diwali 2025: दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा थंडगार चीज चहा, अनोख्या रेसिपीने करा पाहुण्यांचे स्वागत

Diwali 2025: लक्ष्मीपुजनाला तुमच्या राशीनुसार करा लक्ष्मी मंत्रांचा जप, तुमच्या घरात होईल धनाचा वर्षाव
4

Diwali 2025: लक्ष्मीपुजनाला तुमच्या राशीनुसार करा लक्ष्मी मंत्रांचा जप, तुमच्या घरात होईल धनाचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.