पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देणार आंध्र प्रदेशला भेट; 13430 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे करणार उद्घाटन
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. त्यातच आता पंतप्रधान मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान ते 13430 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. याशिवाय, कुर्नूलमध्ये सुपर जीएसटी-सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमातही ते सहभागी होतील, असे सांगण्यात आले आहे.
आंध्र प्रदेश दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी श्रीशैलममधील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानमला भेट देऊन त्यांच्या दौऱ्याची सुरुवात करतील. आंध्र प्रदेशात पोहोचल्यानंतर पंतप्रधान सकाळी श्रीशैलममधील श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानात पूजा करतील. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 52 शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे एकाच संकुलात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ यांचे सहअस्तित्व, ज्यामुळे ते संपूर्ण देशातील अशा प्रकारच्या एकमेव मंदिरांपैकी एक बनले आहे.
हेदेखील वाचा : Delhi Fireworks permission: दिल्लीकरांची दिवाळी होणार धमाकेदार! ग्रीन फटाके वाजवण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी
पूजा केल्यानंतर ते शिवाजी स्फुर्ती केंद्राला भेट देतील. हे केंद्र प्रतापगड, राजगड, रायगड आणि शिवनेरी किल्ल्यांचे मॉडेल त्याच्या चारही कोपऱ्यांवर बांधले गेले आहेत आणि मध्यभागी शिवाजी महाराजांच्या स्मृतीस समर्पित ध्यानगृह आहे.
ग्रीनफिल्ड महामार्गाची पायाभरणी
पंतप्रधान मोदी हे सब्बावरम ते शीलानगरपर्यंतच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड महामार्गाची पायाभरणी देखील करतील, ज्याचा खर्च 960 कोटी रुपये आहे. ते पिलेरू-कलूर रस्ता विभागाच्या चार पदरी विस्ताराचे, कडप्पा-नेल्लोर सीमेपासून सीएस पुरमपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे आणि गुडीवाडा-नुजेला रेल्वे स्थानकांदरम्यान चार पदरी रेल्वे ओव्हरब्रिज (आरओबी) चे उद्घाटन देखील करतील.
विविध विकासकामांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदी हे कुर्नूलला जातील, जिथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते कुर्नूल-३ पूलिंग स्टेशनवर २८८० कोटी रुपयांच्या ट्रान्समिशन सिस्टम मजबूतीकरण प्रकल्पाची पायाभरणी करतील. ते कडप्पा येथील ४९२० कोटी रुपयांच्या ओर्वकल औद्योगिक क्षेत्र आणि ४९२० कोटी रुपयांच्या कोपर्थी औद्योगिक क्षेत्राची पायाभरणी देखील करतील. यातून अंदाजे २१००० कोटींची गुंतवणूक आणि १००००० रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.