Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Gandhi on Vande Mataram: ‘वंदे मातरम’वर चर्चा की राजकारण? प्रियांका गांधींकडून भाजपची पोलखोल

आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. या सरकारला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर नवीन आरोप लादण्याची संधी हवी आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 08, 2025 | 05:09 PM
Priyanka Gandhi attack,

Priyanka Gandhi attack,

Follow Us
Close
Follow Us:
  • वंदे मातरमवरील चर्चेसाठी दहा तासांचा वेळ
  • बंगालच्या निवडणुकांमुळे वंदे मातरमवरील वाद निर्माण केला जात आहे
  • आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू
Priyanka Gandhi on Vande Mataram: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आज लोकसभेत विशेष चर्चासत्र पार पडले. पंतप्रधान मोदींनी दुपारी १२ वाजता चर्चेला सुरुवात केली. लोकसभेत वंदे मातरमवरील चर्चेसाठी दहा तासांचा वेळ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी वंदे मातरमच्या मुद्द्यावरून तत्तकालीन काँग्रेस सरकारवर जोरदार टिका केली. ‘वंदे मातरम’ हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा आवाज बनला आणि प्रत्येक भारतीयाच्या भावना व्यक्त करणारा मंत्र ठरला. तथापि, १९३७ मध्ये या गीतातील एक महत्त्वाचा श्लोक काढून टाकण्यात आला. राष्ट्रनिर्मितीच्या या “महान मंत्रावर” अन्याय का झाला, हे आजच्या पिढीने समजून घेण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भाषणार आता काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधींनी समाचार घेतला आहे. लोकसभेत वंदे मातरमवरील चर्चेदरम्यान काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा म्हणाल्या की, वंदे मातरम हे गीत त्याच्या स्वत: च्या धैर्याची आठवण करून देते. वंदे मातरम हे राष्ट्राच्या आत्म्याचा भाग आहे. वंदे मातरमवरील चर्चा का आवश्यक आहे. असा सवाल उपस्थित केला. तसेच, सरकार जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. बंगालच्या निवडणुकांमुळे वंदे मातरमवरील वाद निर्माण केला जात असल्याचा आरोपही यावेळ प्रियांका गांधींनी केल.

Explainer: “वंदे मातरम्- राष्ट्रभावना की राजकीय अजेंडा?” इतिहासापासून वादापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

सभागृहात भाजपवर निशाणा साधत प्रियांका गांधी म्हणाल्या, “आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आपण येथेच राहू आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. या सरकारला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्यांवर नवीन आरोप लादण्याची संधी हवी आहे. असे करून मोदी सरकार सार्वजनिक प्रश्नांवर दबाव आणण्यापासून देशाचे लक्ष विचलित करू इच्छित आहे.”

प्रियांका गांधींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंबद्दलही सरकारवर निशाणा साधला. “दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशासाठी आपले जीवन दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी १२ वर्षे तुरुंगात घालवली. त्यांनी इस्रो, डीआरडीओ, एम्स, आयआयटी आणि इतर संस्थांची स्थापना केली. त्यामुळे आता एक दिवस नेहरूंवर चर्चा व्हायला हवी. जर त्यांनी इस्रो बांधला नसता, तर आज आपल्याकडे मंगळयान नसते. काँग्रेसनेच वंदे मातरम’ गीताल राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला.

दरम्यान, प्रियांका गांधींचे भाषण सुरू असताना लोकसभेता मोठा गोंधळही माजल्याचे पाहायला मिळाले. पण त्याचवेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप करत प्रियांका गांधींना वंदे मातरमवर चर्चा करण्यास सांगितले. लो देशातील तरुण त्रस्त आहेत. देशातील महागाई आणि बेरोजगारी यावर चर्चा झाली पाहिजे, असही प्रियांका गांधींनी नमुद केलं.

Vande Mataram 150 years: ‘वंदे मातरम’ माझ्यासाठी खूप प्रेरणादायक; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा म्हणाल्या, “तुम्ही (भाजप) निवडणुकीसाठी आहात, आम्ही देशासाठी आहोत. आम्ही कितीही निवडणुका हरलो तरी आम्ही येथे बसून तुमच्याशी आणि तुमच्या विचारसरणीशी लढत राहू. आम्ही आमच्या देशासाठी लढत राहू. तुम्ही आम्हाला थांबवू शकत नाही.” संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही लोकसभेत वंदे मातरमवरील चर्चेत भाग घेतला. राजनाथ सिंह म्हणाले की, वंदे मातरम इतिहास आणि वर्तमानाशी जोडलेले आहे. वंदे मातरमने देशाला जागृत केले आहे. ते फक्त बंगालच्या निवडणुकांशी संबंधित नाही. वंदे मातरमने ब्रिटिश साम्राज्याला नमन केले आहे.

Web Title: Priyanka gandhi accuses govt of distracting public with vande mataram debate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2025 | 05:09 PM

Topics:  

  • BJP
  • parliament winter session 2025
  • Priyanka Gandhi
  • vande mataram

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला होणार नाव जाहीर
1

पिंपरी-चिंचवडच्या महापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला होणार नाव जाहीर

Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ
2

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?
3

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
4

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.