Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Priyanka Gandhi Loksabha: बलात्काऱ्यांचे समर्थन करणाऱ्याला शिक्षण मंत्री पद…; प्रियांका गांधींची जहरी टिका

प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात सत्ताधारी नेत्यांकडून गोंधळ सुरू झाला. त्यावर हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये आल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने काँग्रेस नेत्याला आपले वक्तव्य सिद्ध करण्यास सांगितले.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 29, 2026 | 08:31 AM
Priyanka Gandhi Lok Sabha Speech Pralhad Joshi, Priyanka Gandhi, Lok Sabha,

Priyanka Gandhi Lok Sabha Speech Pralhad Joshi, Priyanka Gandhi, Lok Sabha,

Follow Us
Follow Us:

Priyanka Gandhi Loksabha:  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा (28 जुलै) दिवस खूपच वादळी ठरला. काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी परीक्षा सुधारणा विधेयकावरुन चर्चा करताना थेट नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्यावरच निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या शिक्षण मंत्र्यांची नियुक्ती केली. पण या पदावर एका अशा व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली ज्याने एका गर्भवती महिलेच्या बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या सुटकेला संमती दिली होती. Priyanka Gandhi’s Scathing Attack On Union Education Minister Pralhad Joshi In Lok Sabha Sparks Ruckus

प्रियांका गांधींच्या वक्तव्यावर किरेन रिजिजू काय म्हणाले?

प्रियांका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभागृहात सत्ताधारी नेत्यांकडून गोंधळ सुरू झाला. त्यावर हे सर्व वर्तमानपत्रांमध्ये आल्याचे प्रियांका गांधी यांनी सांगितले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने काँग्रेस नेत्याला आपले वक्तव्य सिद्ध करण्यास सांगितले. तेव्हा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी , प्रियांका यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, असे सांगितले. तसेच, “असे वक्तव्य म्हणजे चारित्र्यहनन आहे. प्रियांका कदाचित पहिल्यांदाच निवडून आल्या असतील, पण त्या त्यांच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत.” असंही रिजिजू यांनी नमुद केलं.

Priyanka Gandhi: विद्यार्थी काय दहशतवादी होते का? लोकसभेत

अध्यक्षांनी हे वक्तव्य कामकाजातून वगळले

अध्यक्ष ओम बिरला यांनी संसदेच्या कामकाजातून हे वक्तव्य वगळले. अध्यक्ष म्हणाले, “माझा विश्वास आहे की हे सभागृह एक लोकशाही संस्था आहे. येथे बोललेला प्रत्येक शब्द अहवालात समाविष्ट आहे. मी आग्रह करेन की, तथ्यांशिवाय अशा बाबी सभागृहात मांडल्या जाऊ नयेत.”

 

प्रियांका गांधी विद्यार्थी आंदोलनांबद्दल काय म्हणाल्या?

प्रियांका गांधी विद्यार्थी आंदोलनांबद्दल म्हणाल्या की, अलीकडेच हजारो मुले रस्त्यावर उतरली. गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करत, त्यांनी आपल्या हृदयात अहिंसा आणि सत्य ठेवून शांततेने निदर्शने केली. त्यांनी आपला आवाज उठवला. ही भारतातील मुले आहेत, जी गावांमध्ये, महानगरांमध्ये आणि लहान शहरांमध्ये राहतात. जिथे माता आपले दागिने विकतात, वडील आपली जमीन गहाण ठेवतात आणि कुटुंबे आपल्या मुलाच्या स्वप्नासाठी आयुष्यभराची बचत खर्च करतात. आता, त्याच मुलांना वाटू लागले आहे की या देशात कष्टापेक्षा अप्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे. मग, केवळ एक विद्यार्थीच नाही, तर आशाही हरवते.

SC On CJP Protest: जंतर-मंतरवरील विद्यार्थी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला मोठे आदेश

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले

विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आणि आंदोलकांना पांगवण्यासाठी पेलेट गन वापरण्याचे आदेश कोणी दिले, “पेलेट गन वापरण्याचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा आदेश कोणी दिला?” परीक्षेच्या वादावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर का करण्यात आला, असा सवाल प्रियांका गांधींनी उपस्थित केला. प्रियांका गांधींना विद्यार्थ्यांवर झालेल्या या अन्यायाचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मागितले.

 

 

 

Web Title: Priyanka gandhi lok sabha speech attack on education minister pralhad joshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:28 AM

Topics:  

  • Loksabha
  • Parliament Monsoon Session
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video
1

Shrikant Shinde: अरे ऐकून घे ना राहुल, का ओरडतोय…; लोकसभेत श्रीकांत शिंदे कडाडले अन् क्षणार्धात वातावरण… पाहा Video

Priyanka Gandhi: विद्यार्थी काय दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियंका गांधींचा थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल!
2

Priyanka Gandhi: विद्यार्थी काय दहशतवादी होते का? लोकसभेत प्रियंका गांधींचा थेट पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांवर हल्लाबोल!

‘विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज विसरणार नाही; गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; लोकसभेत Gaurav Gogoi यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
3

‘विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज विसरणार नाही; गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; लोकसभेत Gaurav Gogoi यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची SIT चौकशी करा’; भाजप खासदाराची मागणी
4

‘राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची SIT चौकशी करा’; भाजप खासदाराची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.