मुंबई – आयपीएल २०२२ मध्ये दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहली ९ वर्षांनंतर फक्त एक खेळाडू म्हणून IPL सामना खेळत आहे.
डीवाय पाटील स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली आहे, जिथे वेगवान गोलंदाजांनाही उसळी मिळेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १८० धावांचा आकडा गाठला तर त्यांच्या विजयाची शक्यता वाढेल. ९ हंगामानंतर कोहली पहिल्यांदाच खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे.