
Sanjay Raut, Rahul Gandhi, Toxic Test, Sanjay Raut Health
संजय राऊत यांनी तुरुंगातून आल्यानंतर मला कॅन्सर झाल्याचं म्हटलं होतं. त्यावर, तुमच्यावर तुरुंगात विषप्रयोग झाला असावा का? असा सवाल राऊत केला. त्यावर बोलताना त्यांनी अनेक शंका उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले की तुमच्यासारख्या माणसाला अशा प्रकारचा आजार का व्हावा? तुरुंगामध्येच या आजाराची सुरुवात झाली, असे माझ्या लक्षात आले. हे माझ्या आधी लक्षात येत नव्हते. मात्र, त्या दिवशी दिल्लीत प्रमुख नेत्यांशी चर्चा करताना तुरुंगात असलेल्या इतर लोकांबाबतही अशाच प्रकारच्या समस्या – असल्याचे समोर आले. त्यांची प्रकृती खालावली आहे, ते आजारी पडले आहेत. त्यातून एक संशय निर्माण झाला. राहुल गांधींनी मला सांगितले की, तुम्ही ही टेस्ट ताबडतोब करून घ्या. अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आत्मविश्वासाचे मला कमाल वाटते. त्यांच्या काळात चर्चेतून प्रश्न सोडवता येऊ शकतात, असा त्यांना आत्मविश्वास आहे. गेले अनेक काळ आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हेच सांगत आहोत की, राजकीय विरोधकांशी शत्रूसारखे वागण्यापेक्षा या राज्याचे प्रश्न आपण एकत्र बसून सोडवू. पण त्यांना ते मान्य नाही. मग पोलिसबळाचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून प्रयत्न केले जातात.” अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.
आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ” सध्याचा गणेशोत्सव किंवा सण-उत्सव पारंपरिक आणि सांस्कृतिक पद्धतीने होत नाही, हे मान्य केले पाहिजे. त्याला व्यावसायिक आणि कॉर्पोरेट स्वरूप प्राप्त झाले आहे. तरीही डीजे किंवा म्युझिक सिस्टीम हा एक मोठा व्यवसाय आहे आणि त्यावर हजारो लोकांचा रोजगार अवलंबून आहे. हे जरी खरं असलं, तरी या – सगळ्या गोंगाटामुळे सामान्य जनजीवन अस्ताव्यस्त होतं.
हॉस्पिटलच्या बाजूला, शाळांच्या बाजूला मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याने रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो. त्यात ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवाची ठिणगी पुण्यात पडली आहे. बापट या तरुणाने आवाज उठवला आणि पुणेकरांनी त्याला पाठिंबा दिला. हा प्रश्न धार्मिक नाही. धार्मिक प्रश्न म्हणजे गणेशमूर्तीचे आगमन वाजत-गाजत, गुलाल उधळून आणि जल्लोषात झाले पाहिजे. मात्र भूकंपाप्रमाणे हादरे देणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री यांनी हा प्रश्न एका दिवसात सोडवला पाहिजे. असंही संजय राऊत यांनी नमुद केलं.
मनोज जरांगे पाटील गेल्या आठ-दहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. तिकडे संवाद आणि चर्चा का होत नाही? गणपतीच्या काळात एका मोठ्या समाजाचा नेता आंदोलन करत आहे. त्याच्यासोबत हजारो लोक आहेत आणि ते मुंबईला यायला निघाले आहेत. १२ तारखेला त्यांच्याशी संवाद करायला तुम्ही तयार व्हा. तुम्हाला लाज वाटते का? नागपूरचा वेगळा विषय, पुण्याचा वेगळा विषय आणि मुंबईतील डीजे बंदीचा वेगळा विषय.” असा टोलाही त्यांनी लगावला
MPSC पेपरफुटीचे प्रकरण सरकारी पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. NEET आणि MPSC पेपरफुटीची प्रकरणे सरकारी पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाहीत. हा विषय आता राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील स्वरूपाचा झाला आहे. नरहरी झिरवळ यांना समाजासमोर बोलावून घ्या. इतर लोकांना बोलावले, त्यांची चौकशी केली; पण झिरवळांची चौकशी का केली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.