Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेत हजारो विद्यार्थिनी सहभागी झाल्या. यावेळी काही तरुणींनी मंचावर जाऊन घरातील अडथळे, छेडछाड आणि शिक्षणातील संघर्षाबाबत अनुभव सांगितले. राहुल गांधी यांनी महिलांवरील हिंसाचाराची आकडेवारी मांडत अनेक प्रकरणांची नोंद होत नसल्याची चिंता व्यक्त केली.

  • By विवेक
Updated On: Aug 22, 2026 | 09:30 PM
पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी

Follow Us
Follow Us:
  • राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनींची उपस्थिती.
  • काही तरुणींनी मंचावर येऊन शिक्षण, घरातील बंधने आणि छेडछाडीचे अनुभव सांगितले.
  • महिलांवरील हिंसाचारासंदर्भात राहुल गांधी यांनी आकडेवारी सादर करत अनेक प्रकरणे नोंदली जात नसल्याचा दावा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची पुण्यातील सभा पार पडली. या कार्यक्रमाला त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. विशेषतः Gen Z मधील तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमाचे स्वरूप राजनैतिक न ठेवता संवादात्मक ठेवले. सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी तसे स्पष्ट केले. उपस्थित तरुणींशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही विद्यार्थिनींना मंचावर येऊन स्वतःचे अनुभव मांडण्याची संधी देण्यात आली.

तरुणींनी मंचावर मांडल्या व्यथा

मंचावर आलेल्या काही विद्यार्थिनींनी घरातील बंधने, सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड आणि शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींबाबत आपले अनुभव सांगितले. मुलींना शिक्षण आणि जीवनात पुढे जाण्यासाठी अधिक संधी मिळणे आवश्यक असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या सुरक्षिततेसोबतच त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि समान संधी मिळण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

‘महिला या देशाची सर्वात मोठी ताकद’; राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’मध्ये तरुणाईशी संवाद

महिलांवरील हिंसाचाराची आकडेवारी सादर

राहुल गांधी यांनी संवादादरम्यान एक PPT सादर करत महिलांवरील हिंसाचाराशी संबंधित काही आकडेवारी मांडली. देशातील अनेक महिलांना लैंगिक अत्याचार आणि विविध प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचा दावा त्यांनी केला. यातील अनेक घटनांची अधिकृत नोंदच होत नसल्याने प्रत्यक्ष परिस्थिती उपलब्ध आकडेवारीपेक्षा गंभीर असू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

राहुल गांधी यांनी मुलींच्या जन्मापूर्वी होणाऱ्या कथित भ्रूणहत्येपासून ते सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड आणि घरगुती हिंसाचारापर्यंत विविध मुद्दे उपस्थित केले. कार्यक्रमाला उपस्थित तरुणींमधील मोठ्या प्रमाणावर मुलींना छेडछाडीचा अनुभव असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच महिलांवरील शारीरिक हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांबाबतही त्यांनी काही आकडे सभेत मांडले.

बारामतीत संजय राऊतांच्या रामरक्षा आंदोलनात राडा; ‘भाजपवाला दिसला की कॉलर पकडा’, वक्तव्याने खळबळ

‘महिलांची स्थिती गंभीर’

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांकडे केवळ आकडे म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेण्याची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. महिलांना सुरक्षित वातावरण, शिक्षण आणि समान संधी उपलब्ध करून देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचा संदेश त्यांनी दिला.

पुण्यातील या कार्यक्रमात राजकीय भाषणापेक्षा तरुणींचे प्रश्न आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. त्यामुळे राहुल गांधींच्या या संवादाकडे राजकीय वर्तुळासोबतच तरुणाईचे लक्ष वेधले गेले.

Web Title: Rahul gandhi pune speech women violence data gen z

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • Congress
  • pune news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
2

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक
3

Rahul Gandhi Protest : सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये राडा; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राहुल गांधीसह INDIA आघाडी आक्रमक

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर
4

Rajghat Protest Day 3 Delhi News: मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधकांचे रान पेटले! राहुल गांधीसह विरोधी पक्षनेते आज राजघाटवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.