७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी (kanyakumari) येथून सुरू झालेली काँग्रेसची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या शेवटच्या टप्यात ही यात्रा सध्या जम्मू काश्मीर मध्ये पोहोचली आहे. 3970 किलोमीटरचा प्रवास करुन आज यात्रा श्रीनगर येथे पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी लाल चौकात तिरंगा फडकवला. यावेळी राहुल गांधींसोबत (rahul gandhi) जयराम रमेश,(jayram ramesh) मल्लिकार्जुन खरगे, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांचाही सहभाग होता.
[read_also content=”60 प्रवाशांना घेऊन जाणारी बस खडकावरून पडली; 24 जणांचा मृत्यू, “डेव्हिल टर्न” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी अपघात! https://www.navarashtra.com/world/24-killed-as-bus-carrying-60-passengers-falls-off-cliff-in-peru-nrps-365382.html”]
भारत जोडो यात्रेसाठी अगोदरच कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यात्रेच्या सुरुवातीच्या ठिकाणाकडे जाणारे सर्व रस्ते सुरक्षा यंत्रणामार्फत बंद करण्यात आले. श्रीनगरच्या चेश्मा शाही रोडवर यात्रेचा मुक्काम असून सायंकाळी साडेपाच वाजता राहुल पत्रकार परिषद घेणार आहेत.यावेळी कार्यक्रमस्थळी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून संपूर्ण परिसर बॅरिकेड्स लावून सील करण्यात आला होता तसेच आजूबाजूची सर्व दुकाने बंद होती. केवळ अधिकृत वाहने आणि पत्रकारांना यात्रास्थळी जाण्याची परवानगी होती. राहुल गांधींच्या भोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था होती. दक्षिण काश्मीरच्या चुरसू परिसरात यात्रेचे उत्साही समर्थकांनी स्वागत केले. तिरंगा आणि पक्षाचे झेंडे घेऊन निघालेल्या यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल गांधींनी पांढऱ्या टी-शर्ट आणि स्लीव्हलेस जॅकेटमध्ये पदयात्रेला सुरुवात केली
बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूल, गलांदर, पंपोर मार्गे ही यात्रा पांथा चौकात आली. पुलवामा येथून पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती आणि मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते राहुल यांच्या यात्रेत सामील झाले. याशिवाय प्रियांका गांधीही पुलवामामध्ये सहभागी झाल्या होत्या.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, भारत जोडो यात्रा ही काश्मीरमधील ताज्या हवेच्या श्वासासारखी आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येने लोकांना 2019 नंतर प्रथमच घराबाहेर पडण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द केले आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना बाहेर पडू दिले नाही. राहुलसोबत फिरण्याचा अनुभव खूप छान होता. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
काँग्रेसचे सरचिटणीस आणि भारत जोडो यात्रेचे संपर्क प्रभारी जयराम रमेश म्हणाले की, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसला कोणत्याही विरोधी आघाडीचा कणा बनवावा लागेल, कारण काँग्रेस हा एकमेव प्रमुख विरोधी पक्ष आहे. . या वर्षी गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड अशी आणखी एक यात्रा काढण्यामागे आपण आपले वजन निश्चितच टाकणार असल्याचे ते म्हणाले, पण शेवटी पक्षालाच निर्णय घ्यायचा आहे. रमेश यांनी दावा केला की भाजपची सत्ता असू शकते, परंतु उपस्थितीच्या बाबतीत काँग्रेस ही एकमेव राष्ट्रीय राजकीय शक्ती आहे.