व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात; व्यावसायिकांना दिलासा
मुंबई : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या (LPG Cylinder) (१९ किलो) किमती आज कमी झाल्या आहेत, यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOC) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ३६ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
दिल्लीत (Delhi) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ३६ रुपयांनी कपात केल्यानंतर १९७६.५० रुपये प्रतिसिलिंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलिंडर २०१२.५० रुपये होती. कोलकातामध्ये (Kolkata) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ३६.५० रुपयांची कपात केल्यानंतर ती २०९५.५० रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलिंडर २१३२ रुपये होती. मुंबईत (Mumbai) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ३६ रुपयांनी कपात केल्यानंतर आता १९३६.५० रुपये प्रति सिलिंडर झाला आहे, पूर्वी १९७२.५० रुपये प्रति सिलिंडर होता.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३६ रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना १९ किलोचा सिलिंडर ३६ रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे.