Rickshaw Driver Kidnapped And Raped The Girl Threw The Body In The River And Nrdm
रिक्षा चालकाने मुलीचे अपहरण करून केला बलात्कार, मृतदेह नदीत फेकला अन्…
आसाममधील कामरूप जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह दिगारू नदीत फेकल्याप्रकरणी एका ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
कामरूप : आसाममधील (Asam) कामरूप (Kamrup) जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर (Girl) बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह दिगारू नदीत फेकल्याप्रकरणी एका ऑटोरिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी 30 जून रोजी म्हणजेच गेल्या शुक्रवारी एका 16 वर्षीय मुलीचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. ऑटोरिक्षा चालक बबलू तुमंग याच्यावर एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
तपासादरम्यान तुमुंगने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जवळच्या दुकानात गेल्यानंतर 26 जून रोजी मुलगी बेपत्ता झाली होती. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून स्थानिकांनी रविवारी सोनपूर पोलीस ठाण्यात निदर्शने केली. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी त्यांनी केली. आरोपींना फासावर लटकवा, असेही लोक म्हणाले.
गुवाहाटीचे माजी उपायुक्त सुरजित सिंह पानेसर म्हणाले, “आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.” पोलिसांनी सांगितले की, पुढील कारवाई केली जाईल आणि पुरावे गोळा केले जातील जेणेकरून आरोपीला त्याच्या प्रत्येक क्रूर वर्तनासाठी योग्य ती शिक्षा मिळेल.
Web Title: Rickshaw driver kidnapped and raped the girl threw the body in the river and nrdm