महाराष्ट्राच्या विधीमंडळात विरोधीपक्षनेता नसल्याने खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका केली (फोटो - सोशल मीडिया)
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे झाले आहे की विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता राहिलेला नाही. त्यामुळे विरोधकांचा आवाज विधीमंडळामध्ये उरला नसल्याचे दिसून येत आहे. तसेच जनतेची बाजू मांडण्यासाठी विरोधी पक्षनेता महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मात्र यावेळी देखील विरोधी पक्षनेत्याशिवाय अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा भाजपचा अहंकार असून हे लोकशाही साठी बरोबर नाही अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.
हे देखील वाचा :राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अधिवेशन
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, – विरोधी पक्ष नेत्या शिवाय अधिवेशन का चालवले जात आहे? हा कसला अहंकार आहे. भाजप, शिंदे गट तसेच वागत आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेता असला पाहिजे अशी मागणी होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पाहिजे का ? हे लोकशाही साठी बरोबर नाही. कोणीही विरोधी पक्ष नेता विषयी सोडला नाही … भुजबळ होते ना तेव्हा .. काँग्रेसचा काळात विरोधी पक्षनेत्याला मान दिला होता, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
हे देखील वाचा : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी
मविआचे प्रमुख नेते म्हणून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर जावे, तर राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसला संधी देण्यात यावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, हा प्रामुख्याने विधिमंडळाचा विषय आहे. जेव्हा आमचे तिन्ही पक्षांचे नेते (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) एकत्र बसतील, तेव्हाच कोणाला कोणती जागा द्यायची हे ठरवले जाईल. अद्याप याची कोणतीही अधिकृत कार्यवाही सुरू झालेली नाही,उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विधिमंडळात सक्रिय व्हावे, ही आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, त्यांची स्वतःची इच्छा काय आहे, याची चाचपणी आम्हाला करावी लागेल. तिन्ही पक्षांची भूमिका ऐकून घेतल्यावरच अंतिम निर्णय जाहीर होईल. अनेक नेते बाहेर मतप्रदर्शन करतात, त्यांना करु दे, अशी भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे.






