माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं! लेकानं आईचं 'ते' स्वप्न केलं पूर्ण; VIDEO पाहून व्हाल भावूक (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मुलगा असावा तर असा…
प्रत्येकाचे आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न असते. पण परिस्थितीमुळे किंवा काही आर्थिक अडचणींमुळे लोकांना ते पूर्ण करता येत नाही. प्रत्येक मुलाला देखील आयुष्यात यश मिळाल्यानंतर आपल्या आईची सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा असते. आपल्या आई-वडिलांना जगातील प्रत्येक सुख देण्यासाठी लोक कष्ट करतात. असेच काहीसे या मुलाने केले आहे. त्याने आपल्या आईचे विमानात बसवण्याचे स्वप्न पूर्ण केल आहे.
विमानात बसल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रु
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, मिनषने आपल्या आईला विमानात प्रवासाठी नेले आहे. त्यांच्या कुटुंबातील विमाना यात्रा करणारी पहिली महिला मनिषची आई ठरली आहे. व्हिडिओत पाहू शकता की विमानात बसल्यावर खिडकीतून बाहेर पाहताना आई भावूक झाली आहे. या मध्ये मनिषने प्रवासादरम्यानचे दृश्य शेअर केले आहे. मनिषच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रु दिसत आहे. आई विमानात जेवण करत आहे, खिडकीबाहेर कुतूहलाने पाहत आहे. तिच्या चेहऱ्यावर जगातील सर्वात मोठे सुख मिळवल्याचा आनंद स्पष्टपमे दिसून येत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @manishh_mk_ या अकाउंटवर मनिषने शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे भरुन आले असून त्यांनी देखील त्यांच्या आईला विमानातून जग फिरवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका नेटकऱ्याने भावा तू आयुष्यात सर्वकाही जिंकलास असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने माऊलीच्या आयुष्याचं सार्थक झालं असे म्हटले आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
दोन चिमुकलींना वाचवणारी ‘ती’ ठरली देवदूत ; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






