Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RSS On Delhi CM: कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? RSS कडून ‘या’ नावाला पसंती? भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत

Rss Planning For Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत कमळ फुलले आहे. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 08, 2025 | 10:02 PM
RSS On Delhi CM: कोण होणार दिल्लीचा मुख्यमंत्री? RSS कडून ‘या’ नावाला पसंती? भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत
Follow Us
Close
Follow Us:

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 27 वर्षांनी दिल्लीत कमळ फुलले आहे. भाजपने 48 जागा जिंकल्या आहेत. अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाचा देखील मोठा पराभव झाला आहे. आप पक्ष केवळ 22 जागा जिंकू शकल्या आहेत. 10 वर्षांच्या केजरीवालांच्या सत्तेचा गड भाजपने भेदला आहे. नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. दरम्यान दिल्लीत भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात आहे. तसेच दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? संघाने कोणत्या नावाला पसंती दिली आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची नावे चर्चेत?

वीरेंद्र सचदेवा

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिल्ली भाजप अध्यक्ष रवींद्र सचदेवा यांचेही नाव आहे. भाजपने रवींद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत निवडणूक लढवली आहे. अशा परिस्थितीत जर दिल्लीत भाजप जिंकला तर त्यात वीरेंद्र सचदेवा यांचे मोठे योगदान असेल. पक्षाचे उच्चायुक्त दिल्लीची संपूर्ण कमान त्यांच्याकडे सोपवू शकतात हे स्पष्ट आहे.

स्मृती इराणी

भाजपच्या माजी खासदार आणि स्टार प्रचारक स्मृती इराणी यांनाही दिल्लीत वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत अमेठीची जागा गमावल्यानंतर, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या कोणतेही मोठे पद भूषवत नाहीत. अशा परिस्थितीत स्मृती इराणी यांना दिल्लीची सूत्रे मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

मनजिंदर सिंग सिरसा

राजौरी गार्डनमधून भाजपचे उमेदवार असलेले मनजिंदर सिंग सिरसा यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या यादीत समाविष्ट आहे. मनजिंदर सिंग सिरसा हे दिल्लीपासून पंजाबपर्यंत प्रभावशाली आहेत. अशा परिस्थितीत, सिरसा यांना मुख्यमंत्री बनवून, भाजप केवळ दिल्लीचेच नाही तर पंजाबचे राजकारणही सांभाळू शकते.

दुष्यंत गौतम

दिल्लीच्या करोल बाग विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे दुष्यंत गौतम हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारांच्या यादीत आहेत. करोल बाग हे दिल्लीतील लोकप्रिय मतदारसंघांपैकी एक मानले जाते, तर दुष्यंत गौतम हे दलित (एससी) उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत, त्यांना मुख्यमंत्री बनवून, भाजप दलितांना आपल्या बाजूने घेण्याची रणनीती बनवू शकते.

हेही वाचा: Delhi Election Result : काँग्रेसच्या ७० पैकी ६७ उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त; मतांचा टक्का किती? एकदा वाचाच

प्रवेश वर्मांचे नाव अधिक चर्चेत

भाजपने नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल आणि संदीप दीक्षित यांचा पराभव केला आहे. दरम्यान दिल्लीचा मुख्यमंत्री प्रवेश वर्मा होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. भाजपकडून वरिष्ठ पातळीवर देखील प्रवेश वर्मा यांचा नाव निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. 

प्रवेश वर्मा

नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे परवेश वर्मा हे देखील सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडीवर होते. प्रवेश वर्मा यांचा विजय झाला असून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. प्रवेश वर्मा केजरीवाल यांना पराभूत करण्यात यशस्वी झाले असून मुख्यमंत्रीपदासाठी हा एक मजबूत चेहरा ठरू शकतात. केजरीवाल यांना पराभूत करण्याच्या बदल्यात, भाजप त्यांना मुख्यमंत्री बनवून सर्वात मोठी भेट देऊ शकते.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणाला पाठिंबा?

दिल्लीमध्ये भाजपच्या विजयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले जात आहे. संघाचे मायक्रो प्लॅनिंग आणि योग्य नियोजन यामुळे दिल्लीत भाजपचा विजय सोपं झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान प्रवेश वर्मा हेच दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री होतील अशी शक्यता जास्त आहे. प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. त्यांनी राजकरणातील संपर्क दांडगा असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा: PM Narendra Modi: दिल्लीतील BJP च्या अभूतपूर्व विजयावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

अनेक निवडणुकांप्रमाणे दिल्लीच्या निवडणुकीत भाजपच्या विजयासाठी संघाचे योगदान मोलाचे असल्याचे म्हटले जात आहे. संघाने अगदी योग्य नियोजन करून भाजपचा विजयाचा सोपा केला असल्याचे म्हटले आहे. तसेच प्रवेश वर्मा हे देखील संघ परिवाराशी संबंधित आहेत. संघातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. तसेच लहानपणापासूनच प्रवेश वर्मा हे संघाचे स्वयंसेवक आहेत. केशवपुर या ठिकाणी प्रवेश वर्मा हे शाखेचे प्रमुख देखील राहिलेले आहेत. तसेच त्यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. त्यामुळे संघाची देखील मुख्यमंत्रीपदासाठी प्रवेश वर्मा यांच्या नावाला पसंती असण्याची दाट शक्यता आहे. संघाची पसंती असेल तर भाजपचे नेतृत्व काय निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे. मात्र जोवर अधिकृत निर्णय होत नाही तोवर चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार नाही.

Web Title: Rss want parvesh verma to become chief minister of delhi narendra modi amit shah bjp defeated and arvind kejriwal at assembly election 2025 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 09:58 PM

Topics:  

  • Arvind kejriwal
  • BJP
  • Delhi Assembly Election
  • RSS

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.