Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk यांना जबरदस्ती उचललं? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; पोलिसांच्या कारवाईवर तातडीच्या…

सोनम वांगचूक आणि अन्य आंदोलकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आता थेट सुपीरम कोर्टात दाद मागण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतर-मंतरवरून ताब्यात घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात दाखल केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 04:28 PM
Sonam Wangchuk यांना जबरदस्ती उचललं? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल; पोलिसांच्या कारवाईवर तातडीच्या…
Follow Us
Follow Us:
  • सोनम वांगचूक प्रकरणात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल
  • याचिकेत या प्रकरणावर तातडीच्या सुनावणीची मागणी 
  • हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी केली जंतरमंतरवर कारवाई 
Jantar Mantar/Delhi Police: नीट पेपर लीक प्रकरणात दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर सोनम वांगचूक गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आज पोलिसांनी सोनम वांगचूक यांना आंदोलनस्थळावरून ताब्यात घेऊन रूग्णालयात दाखल केले आहे. याबाबत आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच अभिजीत दिपकेने देखील उपोषणाची घोषणा केली आहे.

सोनम वांगचूक आणि अन्य आंदोलकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आता थेट सुपीरम कोर्टात दाद मागण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतर-मंतरवरून ताब्यात घेऊन दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात दाखल केले आहे. तसेच अन्य आंदोलकांना देखील तेथून हटविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते आहे. यानंतर काही तासांच्या आतच सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Abhijeet Dipke : सोनम वांगचुक यांना हटवल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलन पेटले; अभिजीत दिपकेंवर शाईफेक, उपोषणाची घोषणा

सुप्रीम कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच भारतीय सरन्यायाधीश यांच्यासमोर याचिका दाखल करण्यात आली असून यावर तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी बेकायदेशीरपणे वांगचूक यांना ताब्यात घेतल्याचा उल्लेख या याचिकेत करण्यात आला आहे.

मागील 20 दिवसांपासून जंतरमंतर मैदानावर सीजेपी आणि सोनम वांगचूक हे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली हायकोर्टात धाव घेण्यात आली होती. हायकोर्टाने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत सरकारला काही आदेश देखील दिले होते. मात्र आज सकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रूग्णालयात दाखल केले.

अभिजीत दिपकेवर शाईफेक

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली. याचदरम्यान एका महिलेने त्यांच्यावर शाईफेक केल्याने आंदोलनस्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित आंदोलकांनी संबंधित महिलेला तात्काळ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या दिल्ली पोलीस तिची चौकशी करत आहेत.

Modi Must Resign: आता धर्मेद्र प्रधानांचा नाही थेट नरेंद्र मोदींचा राजीनामा..! जंतर-मंतरवरील राड्यानंतर अभिजीतचा आक्रमक पवित्रा

‘सोनम वांगचुक यांना गुन्हेगारासारखे उचलले’

अभिजीत दिपके यांनी आंदोलकांना संबोधित करताना सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ज्या पद्धतीने आंदोलनस्थळावरून हटवले, त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “त्यांना गुन्हेगारांप्रमाणे उचलून नेण्यात आले. आंदोलन कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आता मी त्यांच्या जागी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करत आहे,” असे त्यांनी सांगितले.

Web Title: Senior advocate file petition in supreme court delhi police action arrest sonam wangchuk jantar mantar neet paper leak cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • CJP
  • neet paper leak
  • Sonam Wangchuk
  • Supreme Court

संबंधित बातम्या

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा
1

सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा

Sonam Wangchuk यांच्या प्रकृतीबाबत पत्नीचा गंभीर आरोप; सफदरजंग रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल देण्यास नकार
2

Sonam Wangchuk यांच्या प्रकृतीबाबत पत्नीचा गंभीर आरोप; सफदरजंग रुग्णालयाकडून वैद्यकीय अहवाल देण्यास नकार

Sonam Wangchuk : ‘लोकशाहीचा मृत्यू!’ ऋतुजा बागवेनेही धरली मागणी; सोनम वांगचुक यांना जाहीर केला पाठिंबा
3

Sonam Wangchuk : ‘लोकशाहीचा मृत्यू!’ ऋतुजा बागवेनेही धरली मागणी; सोनम वांगचुक यांना जाहीर केला पाठिंबा

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल
4

सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक, ‘हे भ्याड सरकार आहे,’ म्हणत केला हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.