Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Union Budget 2026: “बजेटमधून केरळ गायब…”, अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार

Shashi Tharoor News: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये केरळला डावलल्याचा आरोप करत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारला ७ प्रश्नांद्वारे धारेवर धरले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 08:14 PM
अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार (Photo Credit - X)

अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले; केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “बजेटमधून केरळ गायब…”,
  • अर्थसंकल्प पाहून Shashi Tharoor भडकले
  • केंद्र सरकारवर प्रश्नांचा प्रहार
Shashi Tharoor On Central Goverment: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या काही निर्णयांचे स्वागत करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मात्र या अर्थसंकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “निवडणुकीच्या वर्षात केरळला पूर्णपणे डावलण्यात आले असून, हे एक ‘अदृश्य केरळ बजेट’ आहे,” अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सुरुवातीचा गोंधळ आणि नंतर प्रश्नांचा पाऊस

अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतर शशी थरूर यांनी सुरुवातीला सावध प्रतिक्रिया दिली होती. भाषणात माहिती खूपच कमी असल्याने आणि आकडेवारी स्पष्ट नसल्याने आपण गोंधळात पडलो असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, अर्थसंकल्पाचे सविस्तर आकलन केल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एकामागोमाग एक ७ पोस्ट्स करत केंद्र सरकारला धारेवर धरले.

The #UnionBudget2026 calls for a new hashtag: #InvisibleKerala! https://t.co/2khNwCWwHT — Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 1, 2026

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

थरूर यांनी उपस्थित केलेले मुख्य ७ आक्षेप:

१. एम्स (AIIMS) बाबत केंद्राचे मौन: “देशभरात २२ नवीन एम्स संस्था स्थापन झाल्या, पण आरोग्यसेवेत देशात आघाडीवर असलेल्या केरळला पुन्हा एकदा वगळण्यात आले, हे धक्कादायक आहे,” असे थरूर यांनी नमूद केले.

२. हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमधून केरळ गायब: देशात ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा झाली असली तरी त्यात केरळचा समावेश नाही. “आम्हाला नवीन संक्षिप्त शब्दांची नाही, तर खऱ्या गाड्यांची गरज आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

३. विझिंजम बंदराकडे दुर्लक्ष: विझिंजम बंदर ही भारताची सागरी संपत्ती आहे, तरीही त्याच्या कनेक्टिव्हिटीसाठी पुरेसा निधी देण्यात आलेला नाही. याला राष्ट्रीय प्राधान्य देण्याऐवी केवळ केरळचा स्थानिक मुद्दा म्हणून पाहिले जात असल्याची टीका त्यांनी केली.

४. आयुर्वेद संस्थेचे आश्वासन हवेत: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने तिरुवनंतपुरमची वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्रातील क्षमता पद्धतशीरपणे दडपली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

५. कुशल कामगारांचे योगदान विसरले: “परकीय चलन साठ्यात आणि कुशल कामगार पुरवण्यात केरळचे योगदान मोठे आहे. मात्र, केंद्राच्या आर्थिक दृष्टिकोनातून केरळ पूर्णपणे अनुपस्थित दिसत आहे,” असे थरूर म्हणाले.

६. “अदृश्य केरळ बजेट” हाच संदेश: निवडणुकीच्या वर्षात केरळचा उल्लेख अर्थसंकल्पात नसणे, हाच केंद्र सरकारचा राज्यातील जनतेला दिलेला संदेश आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

७. स्थानिक नेतृत्वाचे अपयश: थरूर यांनी मल्याळी जनतेच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, “केरळला अशा खऱ्या नेतृत्वाची गरज आहे जे दिल्लीत मल्याळी लोकांचा आदर मिळवेल आणि स्थानिक पातळीवर विकास करेल. सध्या केरळमध्ये या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे.”

Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने

Web Title: Shashi tharoor slams budget 2026 kerala missing 7 questions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • budget 2026
  • central goverment
  • Kerala
  • Nirmala Sitaraman
  • shashi tharoor
  • union budget 2026

संबंधित बातम्या

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
1

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया
2

Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली
3

Union Budget 2026: ‘रविवार’चा अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी ठरला काळा दिवस; सोने-चांदीही कोसळली

Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने
4

Budget 2026: देशाची सुरक्षा आता अधिक भक्कम! लष्कराच्या ताफ्यात दाखल होणार विशेष वाहने आणि शक्तिशाली लढाऊ विमाने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.