कोची : केरळच्या शिहाब छोटूर (Shihab Chittur) यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर करून सर्वांनाच चकित केले. केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील वेलनचेरी येथील रहिवासी असलेल्या शिहाब छोटूर यांनी श्रद्धेचे एक उत्तम उदाहरण मांडताना 370 दिवसांत 8,600 किमी चालत मक्का गाठले. त्यासाठी त्यांनी भारतातून पाकिस्तानमार्गे इराण, इराक, कुवेत आणि शेवटी ते सौदी अरेबियाच्या पवित्र शहरात पोहोचले.
शिहाब यांनी सांगितले की, हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता. जेव्हा ते केरळहून वाघा अटारी बॉर्डरवर पोहोचले, तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा नव्हता, म्हणून त्यांनी ट्रान्झिट व्हिसासाठी अर्ज केला आणि या संपूर्ण प्रक्रियेला अनेक महिने लागले. यावेळी ते वाघा बॉर्डरवरच बांधलेल्या शाळेत राहत होते. नंतर त्यांना पाकिस्तानातून ट्रान्झिट व्हिसाची मंजुरी मिळाल्यावर त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला.
पाकिस्तानने त्यांना फेब्रुवारी 2023 मध्ये व्हिसा दिला आणि त्यांनी अवघ्या चार महिन्यांत मक्का गाठले. त्यांनी सांगितले की, सौदी अरेबियामध्ये प्रवेश केल्यानंतर ते प्रथम मदीनाला पोहोचला जिथे त्याने मक्काला जाण्यापूर्वी 21 दिवस घालवले. शिहाबने मदिना ते मक्का दरम्यानचे 440 किलोमीटरचे अंतर नऊ दिवसांत कापले. त्याचवेळी ते आता म्हणतात की, त्यांची आई नाबा केरळहून मक्केत आल्यानंतर हज यात्रा करणार आहे.