
Spiritual guru Sadhvi Prem Baisa mysterious death blamed on her father Rajasthan Crime
Prem Baisa Death : जयपूर : आध्यात्मिक ज्ञानाने हजारो अनुयायांची मने जिंकणारी साध्वी प्रेम बैसा यांचे गूढ निधन झाले. त्यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. असे काही प्रश्न समोर आले आहेत ज्यांची उत्तरे सध्या राजस्थान पोलिसांकडे नाहीत. बुधवारी संध्याकाळी त्यांना त्यांच्या वडिलांनी रुग्णालयात आणले तेव्हा डॉक्टरांनी त्यांचा मृत झाल्याचे घोषित केले. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या कथावाचक प्रेम बैसा यांच्या निधनामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Rajasthan Crime)
साध्वीच्या मृत्यूनंतर, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली. पोस्टमध्ये लिहिले होते, “मी प्रत्येक क्षण सनातनसाठी जगले. मी संतांना अग्निपरीक्षेसाठी पत्र लिहिले, पण निसर्गाची योजना वेगळी होती. अलविदा, जग! मला देवावर आणि संतांवर विश्वास आहे. जर माझ्या हयातीत नाही तर माझ्या मृत्यूनंतर.” असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की जर साध्वीचा मृत्यू रुग्णालयात झाला असेल, तर त्यांच्या मृत्यूनंतर ही पोस्ट कोणी केली आणि का? ही पोस्ट त्या कोणत्यातरी अग्निपरिक्षेतून अर्थात अडचणीचा सामना करत होत्या हे स्पष्टपणे सांगत होती.
हे देखील वाचा : थातूरमातूर डागडुजी; नांदगाव पेठ आयआरबीचा बोगदा ठरतोय जीवघेणा; उड्डाण पुलाखालील काँक्रिटचा भाग कोसळला
वडील आणि आश्रमाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह
प्रेम बैसा यांचे वडील ब्रह्मनाथ म्हणतात की तिचा मृत्यू चुकीच्या इंजेक्शनमुळे झाला. दरम्यान, जोधपूरमधील पाल रोडवरील साधना कुटीर आश्रमाला त्यांच्या समर्थकांनी घेराव घातला. समर्थकांचा आरोप आहे की साध्वी आणि तिच्या वडिलांमधील संबंध चांगले नव्हते. हनुमान बेनीवाल यांच्यासह अनेक नेत्यांनी आता सत्य उघड करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा : शालेय मुलींबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय! सर्व शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड पुरवावेत
बालोत्रा येथील एका साध्या ट्रक ड्रायव्हरची मुलगी असलेल्या प्रेम बैसा यांनी अध्यात्माच्या विश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांनी बाबा रामदेव सारख्या प्रमुख संतांच्या उपस्थितीत त्यांच्या आश्रमाचे उद्घाटन केले. मात्र त्या एका वादामध्ये अडकल्या होत्या. त्यांचे मूळ गाव असलेल्या परेऊ येथे कुटुंबातील सदस्यांसोबत जमिनीच्या वादात त्या अडकल्या होत्या. द मागील अनेक महिन्यांपासून यामुळे त्यांना मानसिक त्रास होत होता. तसेच सहा महिन्यांपूर्वी, त्यांनी तिच्या वडिलांसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामुळे तिला दुखापत देखील झाली होती.
समर्थकांना न्यायाची अपेक्षा
साध्वी प्रेम बैसा या कोणत्या कट कारस्थानाच्या बळी ठरल्या की त्यांच्या जवळच्या कोणीतरी व्यक्तीने त्यांना धोका दिला? कोणी त्यांना मृत्युदंड दिला? इन्स्टाग्रामवर लिहिल्याप्रमाणे न्याय कोण मागत आहे? हे असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आता राजस्थान पोलिसांच्या तपासात शोधत आहेत. या केसकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच साध्वी प्रेम बैसा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. याच्या अहवालानंतर अनेक प्रश्नांची उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे.