Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवर गुन्हे मागे घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश; ‘गुन्हे मागे घेण्यास…’

राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये काही प्रमाणात हिंसक वळण लागले होते. त्यातच अनेक आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 04, 2026 | 11:22 AM
धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

धर्मांतरविरोधी कायद्याचा लागू होण्याआधीच वापर; पुणे पोलिसांची गफलत उघड

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घोटाळ्याचे पडसाद देशभरात उमटल्यानंतर तरुण आणि विद्यार्थ्यांच्या ‘जेन-जी’ (Gen Z) पिढीने याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली (CJP Protest) दिल्लीमध्ये तब्बल 36 दिवस हे ऐतिहासिक आंदोलन चालले. या आंदोलनादरम्यान असंख्य तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने यावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये काही प्रमाणात हिंसक वळण लागले होते. त्यातच अनेक आंदोलकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यासाठी अभिजित दीपके यांच्याकडून सरकारला विनंती केली जात होती. यावरच आता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. ‘गुन्हेगारी पार्श्वभूमी’ हा शब्द केवळ गंभीर व भीषण स्वरूपाच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या व्यक्तींनाच लागू आहे. अशा गुन्ह्यांची पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांवरील एफआयआर संबंधित राज्य सरकारे कायद्यानुसार मागे घेऊ किंवा ही प्रकरणे बंद करू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नाशिकमध्ये आई-वडिलांनी टाकून दिली चिमुकली; चेहऱ्यावरील निरागस स्मितहास्याने सोशल मीडिया यूजर्स झाले भावूक; Video Viral

दरम्यान, मुंबईत निदर्शने करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत विविध गुन्हे दाखल केले होते. मात्र, आता हे आंदोलन स्थगित झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे कडक आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

36 दिवस चालले होते आंदोलन

नीट परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर फुटीविरोधात जंतरमंतरवरून पेटलेली आंदोलनाची ठिणगी मुंबईपर्यंत पोहोचली होती. या आंदोलनात तरुणाईने सरकारसमोर ३ मुख्य मागण्या मांडल्या होत्या. यामध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची सर्वात प्रमुख आणि आक्रमक मागणी करण्यात आली होती. आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता आणि अनेक विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवले होते.

CJP Protest : सीजेपी आंदोलकांना मोठा दिलासा ! मुंबईतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Web Title: States free to withdraw cases against students in neet agitation says supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Court Decision
  • NEET Exam
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
1

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
2

‘शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण देताना काय निकष होते?’ सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
4

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.