Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर महिलांना कोणी काम देणार नाही! मासिक पाळीत पगारी सुट्टीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मासिक पाळीदरम्यान महिलांना पगारी सुट्टी मिळावी यासाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. याचा महिलांचा रोजगार आणि समाजातील धरणांवर होणाऱ्या परिणामांवर न्यायालयाने आपले मत व्यक्त केले.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2026 | 11:30 AM
...तर महिलांना कोणी काम देणार नाही! मासिक पाळीत पगारी सुट्टीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

...तर महिलांना कोणी काम देणार नाही! मासिक पाळीत पगारी सुट्टीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Follow Us
Follow Us:
  • न्यायालयाने सांगितले की अशा प्रकारच्या निर्णयामुळे महिलांच्या रोजगाराच्या संधींवर परिणाम होऊ शकतो.
  • या मुद्द्यावर सरकारने राज्य आणि संबंधित पक्षांशी चर्चा करून धोरण ठरवावे, असे न्यायालयाने सुचवले.
  • कंपन्या आणि संस्थांवरही अशा निर्णयांचा व्यावसायिक आणि प्रशासकीय परिणाम होऊ शकतो, असे निरीक्षण व्यक्त करण्यात आले.
सुप्रीम कोर्टाने नोकरी करणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान हक्काची सुटी मिळावी असा आदेश देण्यास नकार दिला आहे. याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने म्हटले की, अशा धोरणामुळे नकळत लैंगिक रूढ़िवादी विचारांना खतपाणी मिळू शकते आणि यामुळे महिलांसाठी रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात. कोर्टाने ही गोष्ट सरकारच्या धोरणांशी जोडली गेली आहे, असे सांगत याचिकेवर थेट आदेश देणे टाळले. तसेच अशा प्रकारच्या याचिकांमुळे महिला सक्षम नाहीत, मासिक पाळीमुळे त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचे होत आहे, असे वातावरण निर्माण होईल, ज्यामध्ये त्यांचेच नुकसान आहे. असे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले. याचिकाकर्त्यांनी त्यांची मागणी केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या समोर ठेवली आहे.

पंजाब, राजस्थानसह अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; डोंगराळ भागांत बर्फवृष्टीचा अंदाज तर…

करिअरवर परिणाम होईल

सुप्रीम कोर्टाने सांगितले की, ” मासिक पाळीदरम्यान महिलांना हक्काच रजा दिली तर कंपन्या महिलांना नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करतील. त्यांना जबाबदारीची प दिली जाणार नाहीत. यामुळे महिलांच्या करिअरवा याचा परिणाम होईल. त्यांना घरापुरते मर्यादि ठेवण्याची मानसिकता वाढू शकते. केंद्र सरकार या मुद्द्यावर राज्य आणि संबंधित पक्षाशी चर्चा करू धोरण तयार करावे”.

सरन्यायाधीश म्हणाले, “अशा याचिका भीती निर्माणा करण्यासाठी, महिलांना कमी लेखण्यासाठी, मासिक पाळी ही त्यांच्यासोबत घडणारी वाईट गोष्ट आहे हे दर्शवण्यासाठी दाखल केल्या जातात. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या अधिकार क्षेत्रावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, या प्रकरणी स्वत: कोणतीही महिला न्यायालयात आलेली नाही”.

कंपन्यांवरही परिणाम

न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी सांगितले की, कंपन्यांची जबाबदारीदेखील समजून घेतली पाहिजे, महिलांनी अधिकार मागणे ठीक आहे, मात्र न ज्या कंपन्यांना महिलांना अतिरिक्त पेड लीव द्याव्या लागतील त्यांचा देखील विचार झाला पाहिजे, अशा न प्रकारच्या निर्णयांचा परिणाम हा फक्त कर्मचा-यांवर नव्हे, तर थेट संस्था आणि कंपन्यांवर देखील होतो.

रजेसाठी नियम करा

या प्रकरणावर सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करून धोरण तयार करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. याचिकेत मासिक पाळीमध्ये महिलांना हक्काची रजा मिळावी यासाठी नियम करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

LPG Crisis News: सावध राहा! गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांची आता खैर नाही; मोदी सरकारचे कडक निर्देश जारी

केरळचे दिले उदाहरण

याचिकाकर्त्यांचे वकील एम. आर. शमशाद यांनी सांगितले की, केरळात शाळांमध्ये मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना सूट दिली जाते. तसेच काही खासगी कंपन्यांमध्ये देखील स्वतःहून महिलांना मासिक पाळीदरम्यान सुटी देत आहेत. गर्भावस्थेवेळी अशा हक्काच्या सुटीची तरतूद आहे. यावर सरन्याधीशांनी म्हटले की, स्वैच्छिकपणे दिलेल्या अशा सुविधा चांगल्या आहेत, परंतु कायद्याच्या माध्यमातून त्या अनिवार्य केल्या, तर त्याचे सामाजिक आणि व्यावसायिक परिणाम होऊ शकतात. यामुळे अशी धारणा निर्माण होऊ शकते की महिलांना अतिरिक्त सुट्या मिळतील, ज्याचा परिणाम त्यांच्या रोजगाराच्या संधींवर होऊ शकतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Supreme court menstrual leave petition dismissed explained women jobs impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Job
  • Supreme Court of India

संबंधित बातम्या

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
1

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..
2

CoBRA Commando New Chief: IAS ची संधी नाकारली; आज कोब्राच्या पहिल्या महिला कमांडर बनल्या…..

Gokul Dudh Sangh Election: अदृश्य शक्तींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ४९२ दूध संस्थांना मतदानाचा हक्क कायम
3

Gokul Dudh Sangh Election: अदृश्य शक्तींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; ४९२ दूध संस्थांना मतदानाचा हक्क कायम

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
4

Supreme Court Of India: जंतर मंतर आंदोलनात पेलेट गनचा वापर?   चौकशी समितीत बदलास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.