File Photo : baba ramdev
योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या मागच्या अडचणी काही संपताना दिसत नाही आहे. आधीच पंतजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणात ते अडकले आहेत. या प्रकरणाी अजूनही त्यांना दिलासा मिळाला नाही आहे. आता न्यायालयाने रामदेव यांना आणखी एक झटका दिला असून, सर्वोच्च न्यायालयाने आता पतंजली योगपीठ ट्रस्टला (patanjali yog peeth trust) सेवा कर (service tax) भरण्याचे आदेश दिले आहेत.
[read_also content=”सलमान खानच्या सिकंदर चित्रपटासाठी मिळाली हिरोईन, ‘ही’ बॉलिवूड सौंदर्यवती भाईजानसोबत पहिल्यांदाच स्क्रिन करणार शेअर! https://www.navarashtra.com/movies/salman-khan-sikandar-movie-lead-actress-may-be-kiara-advani-as-per-report-nrps-525847.html”]
योगगुरू बाबा रामदेव यांचे देशभरात अनेक फॅालोवर आहेत. ते योगसना द्वारे निरोगी कस राहायचं हे शिकवतात. त्यांच्या पतंजली योगपीठातर्फे देशभरात योग शिबिरे आयोजित केली जातात. आता याच योग शिबिरांसाठी सेवा कर भरण्याचे सेवा कर अपील न्यायाधिकरणाने पतंजली पीठला आदेश दिले होते. या आदेशाला रामदेव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, इथंही त्यांचा हाती निराशाच आली.
आज या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने योग शिबिरांसाठी सेवा कर भरावा लागेल, असा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एम ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सेवा कर अपीलीय न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवला आहे. जर तुम्ही योग शिबिरासाठी प्रवेश शुल्क आकारले तर तुम्हाला सेवा कर देखील भरावा लागेल. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यात अर्थ नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामदेव यांचे अपील फेटाळले.
योग शिबिर हे आरोग्य आणि फिटनेस सेवेच्या श्रेणीत आहे.
योग शिबिराला आरोग्य आणि फिटनेस सेवा या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, तुम्ही जेथे शिबिर लावले, तेथे लोकांकडून प्रवेश शुल्कही आकारले जात असेल, तर सेवाकर भरावा लागेल. समोर आलेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांना 2006 ते 2011 या कालावधीत आयोजित केलेल्या योग शिबिरांसाठी सीमाशुल्क आणि वस्तू आणि विक्रीकर विभागाच्या वतीने एकूण 4.5 कोटी रुपयांचा सेवा कर भरावा लागणार आहे.






