
nitin gadkari and narendra modi
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे 2014 पासून लोकप्रियतेच्या लाटेवर असलेले देशातील सर्वेच्च नेते आहेत. त्यांच्या पक्षात किंवा विरोधकांत त्यांच्या इतका लोकप्रिय नेता तूर्तास तरी पाहण्यात नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्याचा पुनर्प्रत्यय पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवण्यात आलेल्या या निवडमुकीत भाजपाला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं. देशातच नाही तर जगभरात मोदी हे लोकप्रिय नेते असल्याचं मानण्यात येतं. जगातील अनेक देशांच्या पंतप्रधानांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. जगभरात सक्षम नेतृत्व अशी ओळख निर्माण करण्यात नरेंद्र मोदी यशस्वी ठरलेले आहेत. या सगळ्यातच नरेंद्र मोदी यांचा भाजपातील(BJP) उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडमुकीसाठी मतदारांच्या मनात कुणाला कौल आहे, मोदींच्या विरोधात कोणता नेते उभा आहे, असे दिसते, असे अनेक प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले होते. त्यात मोदींचा भाजपातील (Successor Of PM Narendra Modi In BJP) उत्तराधिकारी कोण हा प्रश्न महत्त्वाचा मानला जातोय.
भाजपाच्या या 4 नेत्यांत चुरशीची लढत
इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी केलेल्या या मूड ऑफ द नेशन या सर्व्हेत पुढचा पंतप्रधान कोण असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात 100 पैकी 52.5 टक्के जनतेनं पुढचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सुमारे 9 वर्षांच्या कारभारानंतरही नरेंद्र मोदी यांची जनतेच्या मनात असलेली प्रतिमा किती मोठी आहे, याचंच हे एक उदाहरण म्हणायला हवं.
तर दुसरीकडं मोदींचा उत्तराधिकारी भाजपात कोण, असा प्रश्नही विचारण्यात आला होता. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात सर्वाधिक चुरस असल्याचं पाहायला मिळालं. मात्र या दोन्ही नेत्यांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता खूपच जास्त असल्याचं दिसून आलंय.
कोण होणार मोदींचा उत्तराधिकारी?
भारतीय जनता पार्टीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार, या प्रश्नावर सर्वेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना 26 टक्के मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमाकांवर आहेत योगी आदित्यनाथ. त्यांच्या बाजूनं 25 टक्के जनतेनं कौलौ दिलेला आहे. अनेकांच्या मनात मोदींचा उत्तराधिकारी म्हणून योगींचंच नाव असल्याचं दिसून आलंय. तर 16 टक्के जनतेला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, असं वाटतंय. तर 6 टक्के जनतेला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह मोदींचे उत्तराधिकारी असतील असं वाटतंय.
आत्तापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान कोण?
या सर्वेक्षणानुसार 52 टक्के जनतेला पुढचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच व्हावेत, असं वाटतंय. तर 14 टक्के जनतेची पसंती ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावाला आहे. 5 टक्के लोकांना आपचे संयोजक अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील असं वाटतंय. तर 4 टक्के जनतेला योगी आदित्यनाथ पंतप्रधान होतील, असं वाटतंय. तसचं आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम पंतप्रधानांमध्ये नरेंद्र मोदी यांनी बाजी मारली आहे. 47 टक्के जनतेला मोदी हेच आत्तापर्यंतचे सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, असं वाटतंय.