Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

कोरेगाव तालुक्यातील जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचा निधी देऊन रखडलेली योजना गतिमान केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 25, 2026 | 06:41 PM
काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, '७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले'; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, '७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले'; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती
  • भाडळे येथे जिहे कटापूर योजनेसह विविध कामांचे भूमिपूजन
  • काँग्रेसवर रवींद्र चव्हाणांचा घणाघात
कोरेगाव: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. भाडळे येथे रामोशीवाडी-भाडळे-नलवडेवाडी-बिचुकले-देऊर परिसरातील उपसा जलसिंचन योजनेबरोबरच चिलेवाडी ते कुमठे काँक्रीट रस्त्याचाही शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० ते ७५ वर्षे जिहे-कटापूर योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला. या काळात शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला नवसंजीवनी देत हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामांना गती दिली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाचे पाणी मिळून परिसरातील शेती समृद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली

आमदार महेश शिंदे यांनीही विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना, या योजनेतून कोरेगावला पाणी मिळणार नसल्याचे दावे खोटे ठरल्याचे सांगितले. या प्रकल्पातून कोरेगावला २ टीएमसी पाणी मिळणार असून, माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्याचा मोठा भाग दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढील १३ महिन्यांत या योजनेचे काम पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांनी या योजनेसाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे योगदान अधोरेखित केले. आ. महेश शिंदे यांनी दुष्काळमुक्तीसाठी राजकारणात प्रवेश केला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे या भागातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात या परिसरात औद्योगिक कॉरिडॉर उभारला जाईल आणि स्थानिक युवकांना शेतीबरोबरच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला आमदार अतुल भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार धैर्यशील कदम, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुनील खत्री, नंदगिरी महाराज यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Satara News: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ

Web Title: Vindra chavan slams congress over jihe katapur irrigation project in koregaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Satara News

संबंधित बातम्या

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान
1

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही
2

Maharashtra Earthquake: महाराष्ट्र हादरलं! नाशिकमध्ये 3.6 तर पालघरमध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप, प्रशासन सतर्क, जीवितहानी नाही

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी
3

Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यासाठी मोठी घोषणा! दलित वस्त्यांच्या विकासासाठी ५ कोटींच्या कामांना मंजुरी

रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली
4

रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.