Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा; राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले, “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”

Thalapathy Vijay CM: तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय यांनी शपथ घेतल्यानंतर मित्रपक्षांना मोठा इशारा दिला आहे. "सत्ताकेंद्र फक्त मीच असेन," असे म्हणत त्यांनी आपल्या कामाची दिशा स्पष्ट केली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 10, 2026 | 04:19 PM
मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा (Photo Credit- X)

मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांची मोठी घोषणा
  • राहुल गांधींच्या समोरच ठणकावून सांगितले
  • “माझ्याव्यतिरिक्त कोणीही…”
Thalapathy Vijay CM: तामिळनाडूच्या राजकारणात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मोठ्या राजकीय सस्पेन्सचा अखेर ‘ब्लॉकबस्टर’ शेवट झाला आहे. तामिळनाडूचे सुपरस्टार आणि ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाचे सर्वेसर्वा ‘थलपती’ सी. जोसेफ विजय यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, तामिळनाडूमध्ये आता सत्तेचे दुसरे कोणतेही केंद्र नसेल; सत्तेचे एकमेव केंद्र ते स्वतःच असतील.

‘दुसरे कोणतेही पॉवर सेंटर चालणार नाही’

मुख्यमंत्री विजय यांचे हे पहिलेच विधान मित्रपक्ष आणि राजकीय विरोधक या दोघांसाठीही मोठा संदेश मानला जात आहे. “माझ्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही पॉवर सेंटर असणार नाही. सत्तेचे एकमेव केंद्र मीच राहीन,” असे विजय यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे आघाडीतील घटक पक्षांवर त्यांचे पूर्ण नियंत्रण राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

चुकीचे इरादे असणाऱ्यांना इशारा: ‘मी थम्बी आहे’

आपल्या संबोधनात स्वतःचा उल्लेख ‘थम्बी’ (लहान भाऊ) असा करत विजय यांनी मित्रपक्षांच्या दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांना इशारा देताना ते म्हणाले, “मी स्वतः काहीही चुकीचे करणार नाही आणि माझ्या सोबत कोणाला चुकीचे करू देणार नाही. जर कोणाच्या मनात चुकीचे इरादे असतील, तर त्यांनी ते त्वरित सोडून दिले पाहिजेत.” त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासनावर त्यांची घट्ट पकड असल्याचे दिसून आले.

देशातील अनेक राज्यांत भाजपची सत्ता; हरियाणा ते पश्चिम बंगाल…9 राज्यांत प्रथमच भाजपचे मुख्यमंत्री

राहुल गांधींचा ‘माझा भाऊ’ म्हणून उल्लेख

सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या सर्व नेत्यांचे विजय यांनी व्यासपीठावरून आभार मानले. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख ‘माय ब्रदर’ (माझा भाऊ) असा केला. विजय यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, सेल्वापेरुंथगई आणि प्रवीण चक्रवर्ती यांचे विशेष आभार मानले. तसेच माकप (CPI-M), व्हीसीके (VCK) आणि भाकप (CPI) च्या नेत्यांनाही धन्यवाद दिले. आपल्या सोशल मीडिया वॉरियर्सचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानताना ते भावूक झाले होते.

‘मी देवदूत नाही, तर एक सामान्य माणूस’

“मी कोणी देवदूत नाही, मी तुमच्यासारखाच एक सामान्य माणूस आहे,” असे म्हणत विजय यांनी जनतेला साद घातली. आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी त्यांनी जनतेकडे थोडा वेळ मागितला आहे. “मी अशी कोणतीही आश्वासने देणार नाही जी मी पूर्ण करू शकणार नाही. मात्र, तुमच्या सर्वांच्या सोबतीने आपण अशक्य गोष्टीही साध्य करू शकतो असा मला विश्वास आहे. मला थोडा वेळ द्या, मी हळूहळू सर्व आश्वासने पूर्ण करेन. जनतेच्या एका पैशालाही मी हात लावणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

भाजपमध्ये अमित शाह हेच खरे सम्राट; पक्ष संघटनेपासून मंत्रालयापर्यंत सर्वत्र दबदबा

९ मंत्र्यांनीही घेतली शपथ

मंत्रीपदाची शपथ घेणारे नऊ व्यक्ती पुढीलप्रमाणे आहेत: ‘बुसी’ एन. आनंद, अधव अर्जुना, के.जी. अरुणराज, के.ए. सेनगोट्टैयन, पी. वेंकटरमणन, सी.टी.आर. निर्मलकुमार, ए. राजमोहन, टी.के. प्रभू आणि एस. कीर्तना.

Web Title: Thalapathy vijay cm tamil nadu announcement rahul gandhi power center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Rahul Gandhi
  • Tamil Nadu
  • Thalapathy Vijay
  • TVK

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी
1

Rahul Gandhi on Gyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमारांचा राजीनामा मोदीच घेतील’; राहुल गांधींचा मोठा दावा, देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं
2

Nana Patole : ‘ज्ञानेशकुमार भाजपाच्या दावणीला, फडणवीसांचा मेंदू चोरीला’ नाना पटोलेंचा हल्लाबोल; निवडणूक आयोगावरून राजकारण तापलं

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
3

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा
4

‘पराभवाचे खापर आयोगावर फोडण्याऐवजी आत्मपरीक्षण करा’; शिवेंद्रराजे भोसले यांचा राहुल गांधींवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.