नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीत समन्वय समितीची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर आज या समन्वय समितीची पहिली बैठक झाली. त्यानंतर या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. पाहुया यावरील सविस्तर रिपोर्ट
#WATCH | On INDIA alliance Coordination Committee meeting, Congress General Secretary KC Venugopal says, "The Coordination Committee has decided to start the process for determining seat-sharing. It was decided that member parties would hold talks and decide at the earliest. The… pic.twitter.com/JnOmapYJ7Z
— ANI (@ANI) September 13, 2023
चार प्रमुख गोष्टींवर सविस्तर चर्चा
विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’च्या समन्वय समितीची पहिली बैठक दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीत चार प्रमुख गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली. तसेच, समन्वय समितीची पुढील बैठक कुठे आणि कधी होणार यावर शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसचे प्रवक्ते केसी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
उर्वरित सदस्यांच्या उपस्थितीत बैठक
वेणुगोपाल म्हणाले, शरद पवारांच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी हजर राहू शकले नाहीत कारण ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे. पण, उर्वरित सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
‘या’ चार मुद्द्यांवर झाली चर्चा
या बैठकीत चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे यावेळी वेणुगोपाल यांनी सांगितलं.
१) संयुक्त सभा – इंडिया आघाडातील सर्व पक्षांच्यावतीनं एकत्रितरित्या देशातील विविध भागात सभा घेण्यात येतील.
२) जागा वाटप – जागा वाटपांचा
३) जनगणना – प्रचारादरम्यान जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सर्व पक्षांनी अजेंड्यावर घ्यायचा आहे.
पुढची बैठक कधी आणि कुठे होणार?
इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पुढची बैठक ऑक्टोबरमध्ये भोपाळ इथं होईल, अशी माहितीही यावेळी वेणुगोपाल यांनी दिली.