हरिद्वारमध्ये हे देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. देशविदेशातून पर्यटक इथं येतात. यामध्ये अनेक जाती-धर्माच्या लोकांचा समावेश असतो. मात्र, हरिद्वारमधील एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत (Haridwar Ganga Ghat Controversy)आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक हिंदू तरुण एका मुस्लिम कुटुंबाला हरिद्वारमधील गंगा घाट सोडण्यास सांगत आहे. एव्हढेच नव्हे तर तो या या कुटुंबाशी गैरवर्तन करताना दिसत आहेत. येथे फक्त हिंदूच येऊ शकतात, असं म्हणत त्यांना जाण्यास सांगत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
[read_also content=”शारीरिक संबंध नाकारणे हे हिंदू विवाह कायद्यानुसार क्रूरता, IPC नुसार नाही- कर्नाटक उच्च न्यायालय https://www.navarashtra.com/india/karnataka-hc-says-not-having-sex-is-cruelty-under-hindu-marriage-act-not-under-ipc-419461.html”]
व्हायरल झालेला हा व्हिडिओ हरिद्वारमधील अग्रसेन घाटाचा आहे. येथे एक हिंदू तरुण मुस्लिम कुटुंबाला घाट सोडण्यास सांगत आहे. त्यांचा येथे अधिकार नसल्याचे सांगण्यात येत आहे. तो तरुण त्यांना म्हणतो की, गंगा घाटावर जाण्याचा अधिकार फक्त हिंदू कुटुंबांनाच आहे, बिगर हिंदू कुटुंबांना नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हरिद्वारचे एसपी सिटी स्वतंत्र कुमार यांनी याबाबत चौकशी केली.
व्हायरल व्हिडिओमध्ये निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती काही मुलांना बाहेर जाण्यास सांगत आहे. तो म्हणतोय की, ‘इथे फक्त हिंदूच येऊ शकतात, त्याशिवाय कोणीही येऊ शकत नाही. बाहेर, गेटच्या बाहेर जा. (हिजाब घातलेल्या मुलीकडे इशारा करत) तू पण बाहेर जा. तुम्ही इथून निघून जा.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीचे हिंदू-मुस्लिम असे विभाजन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे काही लोक म्हणाले, तर काही लोक त्याचे समर्थन करत आहेत.याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची दखल घेत हरिद्वार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. न्यायाधिकारी जुही मनरल यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.श हराचे पोलिस अधीक्षक स्वतंत्र कुमार यांनी सांगितले की, घटनेबाबत माहिती गोळा केली जात आहे.पळून गेलेल्या तरुणांची ओळख पटवली जात आहे.