खाद्यतेलाच्या आयातीत झाली मोठी घट; पाम तेलाची आयात ही दहा महिन्यांच्या नीच्चांकावर

नोव्हेंबर ते मार्च या चालू वर्षामध्ये खाद्यतेलांची आयात 17 टक्के कमी राहिली आहे. यातही पाम तेलाची आयात ही दहा महिन्यांच्या निच्चांकावर पोहोचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सूर्यफूल तेल स्वस्त झाल्याने पाम तेलाच्या आयातीमध्ये घसरण झाल्याचे कारण सांगितले जात आहे.

    मुंबई : नोव्हेंबर ते मार्च या चालू वर्षामध्ये खाद्यतेलांची आयात 17 टक्के कमी राहिली आहे. यातही पाम तेलाची आयात ही दहा महिन्यांच्या नीच्चांकावर पोहोचल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सूर्यफूल तेल स्वस्त झाल्याने पाम तेलाच्या आयातीमध्ये घसरण झाल्याचे कारण सांगितले जात आहे.

    फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यात सूर्यफुलाचे तेल 50 टक्के अधिक आयात करण्यात आले आहे. कच्च्या पाम तेलाचे दर 1045 डॉलर प्रति टन आहेत तर याच तुलनेमध्ये सूर्यफुल तेलाचे दर 975 डॉलर प्रति टन आहेत. म्हणजेच पाम तेलापेक्षा सूर्यफुलाचे तेल हे 70 डॉलर प्रती टन कमी आहेत.

    एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2023-24 मध्ये (नोव्हेंबर ते मार्चचा कालावधी) 57.65 लाख टन खाद्य तेलाची आयात करण्यात आली आहे. खाद्यतेलाच्या आयातीमध्ये 17 टक्के घसरण राहिली आहे. मागच्या वर्षी याच अवधीमध्ये 69.80 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले होते. खाद्यतेलाव्यतिरिक्त इतर तेलांची आयात 18 टक्के घसरून 64,883 टनावर राहिली होती.