कोलंबियाने उझबेकिस्तानला केले पराभूत (फोटो- ians)
कोलंबियाचा संघ 2022 मध्ये फिफा वर्ल्डकपमध्ये प्रवेश करण्यास अपात्र ठरला होता. मात्र यंदा 2026 मध्ये कोलंबियाच्या संघाने दणक्यात सुरुवात केली आहे. ऐतिहासिक इस्टाडिओ अझटेका स्टेडियमवर उझबेकिस्तानचा ३-१ असा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे कोलंबियाने या स्पर्धेत आपली विजयी सुरुवात केली आहे.
कोलंबियाने ग्रुप के मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. कोलंबियाने उझबेकिस्तानचा प्रभाव केला आहे. लुईस डियाझ हा खेळाडू कोलंबियाच्या शानदार विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एक गोल करून कोलंबियाला सुरुवात करून दिली. सामना सुरू झाल्यावर कोलंबियाच्या संघाने आपले नियंत्रण मिळवले आहे. 33 व्या मिनिटाला लुईस डियाझने एक अप्रतिम गोल केला. मात्र तो गोल पोस्टला धडकून परतला. मात्र पहिला गोल होण्यासाठी कोलंबियाला फार काल वाट पहावी लागली नाही.
FIFA World Cup 2026: मैदानावर फुटबॉल नव्हे, थेट विषारी साप! जर्मनीची टीम थोडक्यात बचावली
40 व्या मिनिटाला कोलंबियाने पहिला गोल केला. उझबेकिस्तानविरुद्ध कोलंबियाने 1-0 अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात उझबेकिस्ताने आक्रमक खेळ केला. एक तास पूर्ण झाल्यावर त्यांनी पहिला गोल केला. त्यामुळे दोन्ही संघ 1-1 या बरोबरीत आले. मात्र उझबेकिस्तानचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. कोलंबियाने अवघ्या ५ मिनिटांत पुन्हा सामन्यावर पकड मिळवली. शेवटच्या काही मिनिटांमध्ये कोलंबियाने 2 गोल करत सामन्यावर विजय मिळवला.
जर्मनीची टीम थोडक्यात बचावली
फिफा विश्वचषक २०२६ सुरू झाला आहे. सामन्यांचा थराराही वाढत आहे. परंतु, फिफा विश्वचषकाच्या २३ व्या हंगामात, खेळाच्या थराराबरोबरच खेळाडूंच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फिफा विश्वचषक २०२६ दरम्यान, जर्मन संगाच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये साप दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने, जर्मन संघाच्या कोणत्याही खेळाडूला काहीही झाले नाही. ते थोडक्यात बचावले. परंतु, या स्पर्धेत सापांची भीती केवळ जर्मनीवरच हावी झालेली दिसत नाही, तर नॉर्वे आणि स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.






