Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AAP’s Raghav Chadha Joins BJP: केजरीवालांना मोठा झटका! राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील; पाहा फोटो

'आम आदमी पक्षा'साठी (AAP) एक मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 24, 2026 | 06:16 PM
राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील (Photo Credit- ANI)

राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील (Photo Credit- ANI)

Follow Us
Follow Us:

 

  • केजरीवालांना मोठा झटका!
  • राघव चढ्ढा यांच्यासह आपचे तीन राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील
  • पाहा फोटो
AAP’s Raghav Chadha Joins BJP News: राघव चढ्ढा यांच्यासह तीन राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घटनेकडे ‘आम आदमी पक्षा’साठी (AAP) एक मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण खासदारांपैकी दोन-तृतीयांश खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे.
Delhi: Rajya Sabha MPs Raghav Chadha, Sandeep Pathak and Ashok Mittal meet BJP National President Nitin Nabin at the party headquarters 2/3rd MPs of AAP in the Rajya Sabha announced merging with the BJP. pic.twitter.com/cRLnmOQRFZ — ANI (@ANI) April 24, 2026


‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांनी म्हटले, “मी पक्षाच्या कामकाजापासून स्वतःला अलिप्त का ठेवले होते, याचे खरे कारण मी आज तुमच्यासमोर उघड करत आहे. त्यांच्या गुन्ह्यांमध्ये मला सहभागी व्हायचे नव्हते. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होण्यास मी नकार दिला, म्हणूनच त्यांच्या मैत्रीसाठी मला ‘अपात्र’ मानले गेले. आमच्यासमोर केवळ दोनच पर्याय उरले होते: एकतर राजकारण सोडून द्यायचे आणि गेल्या १५-१६ वर्षांपासून आम्ही हाती घेतलेले जनकल्याणाचे काम थांबवायचे; किंवा आपली ऊर्जा आणि अनुभव सत्कारणी लावून सकारात्मक राजकारण करायचे. म्हणूनच, आम्ही म्हणजेच राज्यसभेतील ‘आप’च्या दोन-तृतीयांश सदस्यांनी भारतीय संविधानात नमूद केलेल्या तरतुदींचा वापर करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”

दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदार आमच्यासोबत

आप’मधील फुटीची घोषणा करताना राघव चड्ढा पत्रकार परिषदेत म्हणाले, “राज्यसभेत आम आदमी पक्षाचे १० खासदार आहेत. या मोहिमेत दोन-तृतीयांशपेक्षा जास्त खासदार आमच्यासोबत आहेत. त्यांनी सह्या केल्या आहेत. आम्ही राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र सादर केले आहे.” संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या चड्ढा यांनी सांगितले की, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी आणि स्वाती मालीवाल हे देखील भाजपमध्ये सामील होत आहेत. या सात जणांव्यतिरिक्त आपण त्यांच्याही संपर्कात असल्याचे सांगून राघव चड्ढा यांनी केजरीवाल यांची चिंता वाढवण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’… राघव चढ्ढा यांच्यासह सात खासदार फुटल्यानंतर ‘आप’ची पहिली प्रतिक्रिया समोर

तीन नेत्यांचा आधीच आला होता संशय

आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या सात खासदारांपैकी तिघे असे पाऊल उचलतील अशी आधीच अपेक्षा होती. यामध्ये राघव चड्ढा आणि ‘आप’ यांच्यातील मतभेदांची बातमी सार्वजनिक झाली होती. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा त्यांना उपनेतेपदावरून हटवण्यात आले, तेव्हा चड्ढा कोणत्याही क्षणी केजरीवाल यांना सोडून जातील असा अंदाज वर्तवला जात होता. हरभजन सिंग हेदेखील पक्षाच्या हालचालींवर बराच काळ गप्प राहिले होते. स्वाती मालीवाल यांच्या बंडाची संपूर्ण कहाणी सर्वांनाच माहीत आहे.

‘आप’चे भाजपवर आरोप

या मुद्द्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय सिंह आणि अनुराग ढांडा यांनी एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. ‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी म्हटले की, भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ हा क्षुद्र राजकारणाचा खेळ असून, पंजाब सरकार करत असलेल्या चांगल्या कामात अडथळा आणण्यासाठी रचलेला हा एक कट आहे. त्यांनी अधोरेखित केले की, पंजाब सरकार ३०० युनिट्स मोफत वीज पुरवते, राज्यातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण देते आणि तीस वर्षांपासून कोरड्या पडलेल्या कालव्यांमध्ये पाण्याचा प्रवाह यशस्वीपणे पूर्ववत केला आहे. शिवाय, दलित आणि आदिवासी समुदायातील माता-भगिनींना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. भगवंत मान सरकार गरिबांसाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या मोफत वैद्यकीय उपचार सुविधांचीही खात्री करते. अशा सरकारला अस्थिर करण्याचे आणि त्याचा विश्वासघात करण्याचे काम भाजपने केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

AAP News : राघव चड्ढा अन् हरभजन सिंग यांच्यासह ‘या’ बड्या नेत्यांनी सोडली साथ; ऑपरेशन लोटसने AAP च्या गडाला सुरुंग

Web Title: Three aap rajya sabha mps including raghav chadha join the bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • BJP
  • Raghav Chadha

संबंधित बातम्या

Shehzad Poonawalla Resigns: भाजपकडून राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला चर्चेत! नेमके किती शिकलेत माजी राष्ट्रीय प्रवक्ते?
1

Shehzad Poonawalla Resigns: भाजपकडून राजीनामा दिल्यानंतर शहजाद पूनावाला चर्चेत! नेमके किती शिकलेत माजी राष्ट्रीय प्रवक्ते?

मल्हारपेठ विभागातील मातंग समाज बांधवांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
2

मल्हारपेठ विभागातील मातंग समाज बांधवांकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! खान्देश भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
3

ऑडिओ क्लिपवरून राजकीय वादळ! खान्देश भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ लांबणीवर! मॉन्सून सत्रात बिल नाही; मोदी सरकारची नवी रणनीती काय?
4

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ लांबणीवर! मॉन्सून सत्रात बिल नाही; मोदी सरकारची नवी रणनीती काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.