नवी दिल्ली : देशात पन्हा एकदा टोल वसुलीसाठीची (Tolling System) पद्धत बदलण्यात येणार आहे. देशभरातील टोल नाक्यांवंरील फास्ट टॅग (Fast Tag) पद्धत बंद करण्यात येणार असून, त्याऐवजी जीपेस ट्रॅकिंगच्या (GPS tracking) माध्यमातून आता टोल वसुली करण्याची नवी व्यवस्था राबवण्यात येणार आहे. ही पद्धत सध्या युरोपीयन देशात वापरण्यात येते आहे. आता ही पद्धत आपल्या देशात आणण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या व्यवस्थेला सॅटेलाईट नॅव्हिगेशन टोलिंग सिस्टिम (Sattelite Navigation Tolling System) या नावाने ओळखण्यात येते. ही पद्धत लागू केल्यानंतर देशभरातील रस्त्यांवंरील टोल नाकेही हटविण्यात येतील.
केंद्र सरकारने याबाबत २०२० मध्ये दिल्ली-ग्वाल्हेर मार्गावर व्यावसायिक ट्रक्समध्ये बोर्ड युनिट आणि इस्रोच्या मेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिमच्या मदतीने पायलट प्रोजक्ट सुरु केला होता. तो यशस्वी झाला आहे. आता ही व्यवस्था राबवण्यासाठी केंद्र सरकार काही महत्त्वाच्या चाचण्या करणार आहे.
या चाचणीत देशातील १.३७ लाख गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील ३६,६८०, दिल्लीतील २९,७०५, उत्तराखंडच्या १४,४०१, छत्तीसगडच्या १३,५९२, हिमाचल प्रदेशातील १०,८२४ तर गोव्यातील ९,११२ गाड्यांचा समावेश करण्यात ला आहे. तर मध्यप्रदेश, मणिपूर, सिक्कीम आणि लड्डाखमधील एका एका वाहनावर ही चाचणी करण्यात येणार आहे.
[read_also content=”महागाईचा आगडोंब! पेट्रोल-डिझेल दरात मागील 7 दिवसांत सहावी वाढ, पेट्रोल 30 तर डिझेल 35 पैशांनी महागलं https://www.navarashtra.com/india/inflation-rampant-petrol-diesel-prices-have-gone-up-by-six-paise-in-the-last-seven-days-petrol-by-30-paise-and-diesel-by-35-paise-260715.html”]
रशिया आणि द. कोरियाच्या विशेषज्ञांच्या मदतीने एक अभ्यास करण्यात येतो आहे. ही नवी टोल व्यवस्था लागू करण्याआधी परिवहन धोरणातही बदल करण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे. ही विशेषज्ञांची टीम या धोरणातील बदलाबाबत काही मुद्द्यांवर विचार करीत आहे. पुढील काही ठवड्यात हा अहवाल तयार होण्याची शक्यता आहे.
जर्मनी, रशियात सॅटेलाईट नॅव्हिनेशन सिस्टिमच्या मदतीने टोलची आकारणी करण्यात येते. जर्मनीतील ९९ टक्के वाहनांकडून य़ाच स्वरुपात टोल आकारणी होते. संबंधित महामार्गावर गाडी किती किलोमीटर चाचली, यावरुन हा टोल निश्चित करण्यात येतो. फास्टॅगप्रमाणेच खात्यातून टोलची रक्कम वजा करण्यात येते. देशात सद्यस्थितीत ९७ टक्के वाहनांकडून फास्टॅगद्वारे टोल आकारण्यात येत होता.
नुकतेच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात ६० किमी अंतरावरच टोल असतील, अशी घोषणा केली होती. ६० किमी अंतरात असणारे टोल हटवण्यात येतील, असेही सांगण्यात आले होते. देशात एकूण ७२७ टोलनाके आहेत. या सगळ्यांची अंतरे आता मोजण्यात येत आहेत. यातील अनेक टोलनाके हे बीओटी तत्त्वांवर आहेत, ज्यांच्यातील अंतर कमी आहे. या नियमांत त्यांना कसे हटविण्यात येईल, याबाबत विचार सुरु आहे.
[read_also content=”‘काश्मिरी पंडितांनी जेव्हाही परतण्याचा प्रयत्न केला तेव्हा हत्या झाल्या, ६८० पंडित मारले गेले, एफआयआरही झाली नाही, २०० केसेस दाखल पण एकाही प्रकरणात आरोपपत्र नाही’ https://www.navarashtra.com/india/whenever-kashmiri-pandits-tried-to-return-there-were-killings-680-pandits-were-killed-no-fir-was-registered-200-cases-were-registered-but-no-chargesheet-was-filed-in-any-of-the-cases-nrps-260815.html”]