देशात रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार; एकूण 71 टक्के वाहतूक कव्हर होणार, चौपदरीकरणाचे काम...
नवी दिल्ली : गाड्यांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी, रुळांवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रवासी व मालगाड्यांचा वेग वाढवण्यासाठी भारतीय रेल्वेने पायाभूत सुविधांचा एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. रेल्वे आपल्या सुमारे ११ हजार किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम करणार आहे. या निर्णयामुळे केवळ गाड्यांच्या संचालनाची क्षमताच वाढणार नाही, तर प्रमुख मार्गावरील वाहतुकीची कोंडीही कमी होईल.
सात प्रमुख हाय डेसिंटी मार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले, हे कॉरिडॉर देशातील रेल्वे वाहतुकीचा मोठा हिस्सा हाताळतात. सुमारे ११ हजार किलोमीटरचे हे सात मार्ग संपूर्ण रेल्वे नेटवर्कच्या केवळ १६ टक्के आहेत, तरीही देशातील एकूण रेल्वे वाहतुकीपैकी सुमारे ४१ टक्के वाहतूक या मागविरून होते. रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे वाहतुकीचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदेही अधोरेखित केले.
Accident in Pimpri : ओव्हरटेक करताना टेम्पोची कारला जोरदार धडक; वृद्धाचा मृत्यू, चालक गंभीर
वाहतुकीत व्यत्यय न आणता काम
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रमुख महानगरे आणि औद्योगिक केंद्राना जोडणाऱ्या या मागांवर रुळांची संख्या वाढवल्याने गाड्यांचे संचालन सुरळीत होईल, अतिरिक्त मार्गिका टाकल्यामुळे विद्यमान रुळांवरील ताण कमी होईल आणि गाड्यांना होणारा विलंब लक्षणीयरीत्या कमी होईल.
‘कवच 4.0’ मुळे सुरक्षितता वाढणार
रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासीबतच सुरक्षिततेवरही विशेष भर दिला जात आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, स्वदेशी बनावटीची ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन’ स्वयंचलित ट्रेन सुरक्षा) प्रणाली असलेल्या कवच ४० चा विस्तार दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रेल्वे कॉरिडॉरवरील २.४५० मार्ग किलोमीटरपर्यंत करण्यात आला आहे.
‘कवच 4.0’ तंत्रज्ञान काय आहे?
“कवच ४.० मध्ये अनेक अत्याधुनिक सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रेल्वेच्या स्थानाचा अचूक मागोवा घेणे, मोठ्या यार्डमध्ये सिग्नलविषयक सुधारित माहिती मिळणे आणि ऑप्टिकल फायबर केबल्सद्वारे स्थानकांदरम्यान परस्पर संपर्क (इंटरफेस) साचणे यांरख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. ही प्रणाली विद्यमान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिम यत्रणांनी थेट जोडता येते.






