सोनिया गांधींचे पुस्तक छापण्यास प्रकाशकांवर कोणाचा दबाव? अशोक गेहलोत आक्रमक
“पेंग्विन वर्ल्डवाइड सोनिया गांधी यांचे आगामी पुस्तक जगभरात मूळ स्वरूपात प्रकाशित करण्यास तयार आहे, परंतु पेंग्विन रँडम हाऊस इंडियाला ते भारतात प्रकाशित करण्यासाठी त्यात बदल करायचे आहेत. जगभरात प्रकाशित होणारी गोष्ट भारतात प्रकाशित होऊ शकत नाही, यासाठी कोणते कारण किंवा दबाव आहे?” असा खडा सवालही गेहलोत यांनी उपस्थित केला आहे. भारतात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे पुस्तक प्रकाशित होऊ नये यासाठी दबाव आणला जात आहे. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करण्यासारखे आहे. सोनिया गांधी यांचे जीवन त्याग आणि समर्पणाचे उदाहरण आहे.” असही गेहलोत यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या जीवनाचा त्याग आणि समर्पणाचे उदाहरण देत गेहलोत म्हणाले की, ज्या पवित्रतेने आणि प्रतिष्ठेने त्यांनी देशाची सेवा केली आहे, ती अनुकरणीय आहे. ज्येष्ठ राजकारणी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दबाव आणणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या करण्यासारखे आहे.”
सोनिया गांधींचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रकाशकांवर दबाव आणला जात आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदींच्या राजवटीत चीनने भारतीय भूभागावर केलेला कब्जा यांच्याशी संबंधित भाग काढून टाकण्यासाठी पेंग्विन इंडियावर दबाव आणला जात आहे. ही लोकशाहीची हत्या आहे.” अशी टिकाही गेहलोत यांनी यावेळी केली.
“हे सत्य भारताच्या जनतेपासून का लपवले जात आहे? मोदी सरकार प्रकाशकांवर तथ्ये बदलण्यासाठीही दबाव आणणार आहे का?” सोनिया गांधी यांनी हस्तलिखितात “संपादकीय बदल” करण्यास नकार दिल्यानंतर प्रकाशकाने माघार घेतली. पण तरीही सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र, “बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह,” प्रकाशित होणारच, असंही गेहलोत यांनी म्हटलं आहे.
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यास नकार दिल्याची बातमी समोर आल्यापासून, माध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरू आहे. पेंग्विनने आता या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पेंग्विनने म्हटले आहे की, सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यास ते उत्सुक होते, परंतु लेखिकेने लिहिलेल्या तथ्यांची पडताळणी करणे ही त्यांची जबाबदारी आणि अधिकार आहे.
अशोक गेहलोत म्हणाले, “चीनने भारतीय भूभागावर केलेल्या ताब्याशी संबंधित भाग काढून टाकण्यासाठी पंतप्रधान मोदी, आरएसएस आणि मोदी सरकारकडून पेंग्विनवर दबाव होता.” ते पुढे म्हणाले की, जेव्हा सोनिया गांधींनी नकार दिला, तेव्हा कंपनीने भारतात पुस्तक प्रकाशित करण्यास नकार दिला. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे.






