मणिपूरमध्ये महिलेसह दोघांची हत्या; गोळ्या झाडून खून केल्याचे उघड

मणिपूरच्या इम्फाळमधील पूर्व आणि पश्चिम भागात पोलिसांना दोन मृतदेह (Two Deadbody Found) सापडले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृतांना हात बांधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

    इम्फाळ : मणिपूरच्या इम्फाळमधील पूर्व आणि पश्चिम भागात पोलिसांना दोन मृतदेह (Two Deadbody Found) सापडले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृतांचा हात बांधून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले (Imphal News) आहेत.

    प्राथमिक वृत्तानुसार, ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला त्याच्या डोक्यात गोळी मारण्यात आली. तैरेनपोकपी परिसरात एका महिलेचा मृतदेह सापडला आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. त्यांचे हात पाठीमागे बांधलेले होते. त्यांच्या डोक्यावर गोळ्यांच्या खुणा होत्या.

    दरम्यान, या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे मृतदेह कुकी समुदायातील अपहृत लोकांचे असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील तैरेनपोकपी भागात एका मध्यमवयीन महिलेचा डोक्यात गोळी असलेला मृतदेह सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.