File Photo : Giriraj Singh
कोलकाता : कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याशी केली.
हेदेखील वाचा : Kolkata Case : ‘ती ओरडत होती म्हणून तिचा…’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली
कोलकाता येथील अत्याचारप्रकरणाने संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. असे असताना अनेक विरोधकांकडून ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. त्यात गिरिराज सिंह यांनी विधान केले आहे. ते म्हणाले, ‘ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या किम जोंग उन आहेत. ज्याप्रमाणे किम जोंग विरोधकांना सहन करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे बंगालमध्ये ममता बॅनर्जी विरोध सहन करू शकत नाहीत’.
अत्याचाराच्या घटनेवर गिरिराज सिंह म्हणाले, आज जे लोक अत्याचार झालेल्या मुलीसोबत बंगालमध्ये दिसत नाहीत. पण, ते ममता बॅनर्जी यांच्यासोबत दिसत आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी हरल्या आहेत आणि त्यांनी आपली लोकप्रियता गमावली आहे. गिरीराज सिंग यांनीही वक्फ बोर्डाबद्दल निवेदन दिले. त्यावर गिरिराज सिंह म्हणाले, ‘वक्फ बोर्ड असंवैधानिक आहे. घटनेत कोठेही वक्फ बोर्डाला स्थान नाही’.
विरोधकांचा ममता बॅनर्जींना पाठिंबा
गिरिराजसिंग यांनी पुढे म्हटले की, ‘लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना बंगालमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना दिसत नाहीत. हे नेते ममता बॅनर्जीला पाठिंबा देताना दिसत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
…म्हणूनच ते मुलींसाठी आवाज उठवत नाहीत
लालू यादव, तेजशवी यादव आणि राहुल गांधी बंगालच्या प्रकरणात शांत आहेत. या लोकांना ममताबरोबर हजेरी लावायची आहे, म्हणूनच ते मुलींसाठी आवाज उठवत नाहीत. ममता बॅनर्जी बंगालमध्ये हरल्या आहेत. म्हणून त्या असंवैधानिक गोष्टी बोलते आणि फेडरल रचनेवर विश्वास ठेवत नाही.
हेदेखील वाचा : ‘मी माझ्या मुलाला विचारणार, त्याने असं का केलं…’ कोलकाता प्रकरणातील आरोपी संजयची आई कोणते रहस्य उघड करणार?