नवी दिल्ली : केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजीजू (Kiren Rijiju) यांच्या गाडीला अपघात झाला. रिजीजू ज्या कारने जात होते त्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kasmir) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर (Jammu Srinagar Highway) झाला. या अपघातातून रिजिजू बचावले आहेत. या अपघातानंतर काही क्षणांतच ते त्यांच्या सुरक्षा कवचमध्ये तेथून बाहेर पडले.
Union Minister Kiren Rijiju luckily escaped unhurt after his car collided with truck.
Incident took place just a month after his statement against former Judges. There should be proper investigation. pic.twitter.com/kydvVeUhG9
— News Arena India (@NewsArenaIndia) April 8, 2023
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून रिजीजू यांच्या गाडीचा ताफा जात होता. त्यावेळी ही घटना घडली. मालाने भरलेला ट्रक वाहतूक कोंडीत अडकला होता. नेमका ट्रक रिव्हर्स घेत असतानाच किरेन रिजीजू यांच्या कारवर आदळला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सुरक्षा अधिकाऱ्यांसह जवान अपघातानंतर गाडीच्या दिशेने धाव घेताना दिसत आहे.
ठिक असल्याची माहिती
ट्रकने केंद्रीयमंत्र्यांच्या स्कॉर्पिओला एका बाजूने धडक दिली. याची माहिती मिळताच रिजीजू यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी तात्काळ गाडीजवळ धाव घेतली. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर रिजिजू सुखरूपपणे बाहेर पडले. या अपघातात रिजिजू यांना कोणताही इजा झाली नाही. ते ठिक आणि सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.